रामकृष्ण हे कालीमातेचे भक्त होते. कालीमातेला नैवेद्य दाखवतांना ते नेहमी जेवण चाखून मगच दाखवत असत. लोकांनी याचे कारण त्यांना विचारले. तेव्हा ते म्हणाले, आई आपल्या मुलाला जेवण द्यायच्या आधी स्वतः त्याची चव घेते. त्यातील तिखट आणि मीठ यांचे प्रमाण बघते आणि मगच मुलाला देते. मग मी कालीमातेचा नैवेद्य आधी का चाखून पाहू नये ?
– (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (प.पू. डॉक्टरांचे ज्येष्ठ बंधू) (ख्रिस्ताब्द १९९०)