स्वामी विवेकानंदांची
तथाकथित समाजसुधारकांना चपराक !

इ.स. १८८७ मध्ये सामाजिक परिषद भरली. त्या परिषदेचे उद्घाटन न्या. रानड्यांनी केले. त्या वेळी विवेकानंदांनी त्याच परिषदेत गर्जना केली, “माझ्यासमोर हिंदु समाज सुधारणासंबंधीचे उद्घाटनाचे भाषण आहे”. समारोप करतांना विवेकानंद कडाडले, “रानडे आणि इतर समाजसुधारकहो जिंदे रहो ! या तुमच्या समाजसुधारणा आंग्लाळलेल्या भारताच्या आहेत. समाजसुधारकहो ! हे विसरू नका की, आपल्या हिंदु समाजाच्या समस्या तुम्ही अथवा तुमचे पाश्चामत्त्य गुरु अजूनही आकलू शकत नाही. मग त्या सोडवणे, तर फार दूरच ! हिंदु समाजाच्या समस्या सोडविणाऱ्यांनी ध्यानी घ्यावे की त्यांच्या सुधारणांना धर्मशास्त्रांचे भक्कम अधिष्ठान असले पाहिजे.” (Complete works of Swami Vivekananda Centenary Vol. IV) (हिंदु बांधवा । जागा राहा ॥ रात्र वैऱ्याची आहे ॥, पृ. २०. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी)

Leave a Comment