आमच्या शिक्षणपद्धतीत आमच्या धारणा हव्यात. प्राथमिक शाळेपासून उच्च शिक्षणापर्यंत आमच्या पाप-पुण्य, परलोक, ऋषीसृष्टी, पितरसृष्टी, देवसृष्टी, स्वर्ग-नरक, दृष्ट-अदृष्ट अशा धारणा असायला हव्यात. सगळ्या विषयांत या धारणा हव्यात. अगदी गणित-व्याकरणापासूनच्या पुस्तकांतून असे दृष्टांत हवेत. हिंदुस्थानभर चालू असलेला मिताक्षरा कायदा असायला हवा. त्यानुसार विवाह, दायभाग, दत्तक वगैरे निर्णय व्हावेत. ग्रहणादीपर्वकाळाचे अनुसरण व्हावे. मुलींच्या शाळेत ‘अश्वत्थ’ असावा. अभ्यासाला प्रारंभ होण्याआधी अश्वत्थ प्रदक्षिणा असाव्यात.
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (हिंदुस्थानची दुर्दशा का झाली ?, पृ. १६. )