दुर्योधनाची प्रशंसा करणारी एक कादंबरी गुरुदेवांना दाखविली ते म्हणाले, “महाभारत, रामायण आदी इतिहासातील आमच्या काळ्या व्यक्तीरेखा, मुद्दाम उजळ करून त्यांना प्रतिष्ठित करण्याची गेल्या पन्नास-पाऊणशे वर्षांत अनेकांनी कसोशी केली.
साक्षात व्यास दुर्योधनासंबंधी सांगतात
कंलेरंशस्तु संजज्ञे भुवि दुर्योधनो नृपः ।दुर्बुद्धिःदुर्मतिश्चैवैव, कुरूणामयशस्करः । जगतो यस्तु सर्वस्य विदिष्टा कालपुरुषः । यः सर्वां घातमायास पृथिवीं पृथिवीपते । (महा. आदिपर्व)
राजा दुर्योधन जन्माला आला तो काळपुरुष म्हणूनच ! दुर्बुद्धी, दुर्मती अशा दुर्योधनाने कुरुवंशाला काळीमा फासला. तो सर्व जगाचा वैरी झाला. त्याने पृथ्वीचे स्मशान केले.”
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (वाङ्मय पत्रिका घनगर्जित, वर्ष दुसरे, अंक ३.)