व्यक्तीस्वातंत्र्यामुळे व्यक्तीची, समाजाची आणि राष्ट्राची हानी कशी होते, हे पुढील सूत्रांवरून लक्षात येईल.
१. व्यक्तीस्वातंत्र्यवाले प्राण्यांप्रमाणे स्वतःच्या मनाप्रमाणे वागतात. त्यांच्या हे लक्षात येत नाही की, त्यामुळे ते मनुष्यजन्म वाया घालवतात.
२. व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांचे वागणे स्वकेंद्रित असते. ते इतरांची पर्वा करत नाहीत. यामुळे त्यांचा अहंभाव वाढतो. जितका अहंभाव कमी, तितकी सच्चिदानंदाची अनुभूती अधिक अधिक येते, हे त्यांना कळत नाही.
३. व्यक्ती समाजाचे रक्षण करत नाही, तर समाज व्यक्तीचे रक्षण करतो, हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे समाजासंदर्भात आपले काही दायित्व आहे, हे ते विसरतात.
४. साधनेत प्रगती करतांना स्वेच्छा, परेच्छा आणि ईश्वरेच्छा हे पुढचे पुढचे टप्पे आहेत. व्यक्तीस्वातंत्र्यवाले स्वेच्छेच्या पहिल्याच टप्प्यात अडकतात. त्यामुळे त्यांची या जन्मात साधनेत प्रगती होत नाही.
– डॉ. आठवले (२१.४.२०१४)