घरी एखाद्याने पूजा केली की, घरातील इतर देवघरापुढे उभे राहून सर्व देवांना मिळून एक नमस्कार करतात. याऐवजी त्यांनी प्रत्येक देवतेच्या चित्राकडे किंवा मूर्तीकडे पाहून तिला तिचे नाव घेऊन नमस्कार केल्यास नमस्काराचा, साधनेचा अवधी थोडा वाढतो, तसेच त्यामुळे प्रत्येक देवतेबद्दल प्रेम निर्माण व्हायला लागते. – डॉ. आठवले (२१.३.२०१४)