हल्लीच एकजण भेटायला आले होते. त्यांच्या चेहर्यावर भाव दिसत होता आणि त्यांच्या डोळ्यांत भावाश्रूही होते. ते बोलतांना त्यांची साधना, त्यांचे कार्य, त्यांना आलेल्या अनुभूती इत्यादींविषयी ते बोलायला लागल्यावर त्यांच्यात अहं असल्याचे जाणवले. नंतर हे लक्षात आले की, एखाद्यात भाव असला, तरी अहंभावही असू शकतो ! हे आयुष्यात पाहिलेले पहिलेच उदाहरण आहे. – प.पू. डॉ. जयंत आठवले (८.३.२०१४)