‘सूक्ष्मातले कळायला लागल्यावर सुरुवातीच्या काळात एखाद्याला आगीच्या ज्वाळांनी घेरल्याचे दिसले किंवा जाणवले, तर आग पाण्याने विझते, हे बुद्धीला ज्ञात असल्याने आपतत्त्वाशी संबंधित जलदेवतेचा जप करायला सांगायचो. पुढे अध्यात्माचा अभ्यास झाल्यावर समजले की, आपतत्त्वापेक्षा अग्नी उत्पन्न करणारे
तेजतत्त्व अधिक प्रभावशाली आहे. त्यामुळे जलदेवतेचा जप परिणामकारक होणार नाही. तेव्हा तेजतत्त्वाच्या पुढचे तत्त्व म्हणजे वायूतत्त्व किंवा आकाशतत्त्व यांच्याशी संबंधित देवतेचा नामजप सांगू लागलो. त्याचा लाभही दिसून आला.’ – डॉ. आठवले (चैत्र शुक्ल पक्ष १, कलियुग वर्ष ५११५ (११.४.२०१३))