समष्टी जीवनाशी संबंधित त्रासांसंदर्भात उपाय एकच आणि तो म्हणजे प्रतिकूल काळ संपेपर्यंत वाट पहाणे

आतापर्यंत कोणत्याही वाईट गोष्टीच्या संदर्भात आपण शारीरिक, मानसिक कि आध्यात्मिक कारणामुळे त्रास होत आहे, याचा विचार करून त्यानुसार उपाययोजना करत होतो. हे व्यष्टी जीवनाशी संबंधित असते. आता समष्टी जीवनातील आपत्काळ आल्यामुळे अवर्षण, आतंकवाद अशा त्रासांना सामोरे जावे लागत आहे. पुढे जागतिक महायुद्धही होऊन कोट्यवधी मानव मरणार आहेत. व्यष्टी जीवनाशी संबंधित त्रासांसंदर्भात आपण उपाय करतो, तसे समष्टी जीवनाशी संबंधित त्रासांसंदर्भात उपाय सांगता येत नाहीत. तेव्हा प्रतिकूल काळ संपेपर्यंत वाट पहाणे एवढेच आपल्या हातात असते. त्या काळात साधनारत राहिल्यासच येणार्‍या भीषण काळाला आपण तोंड देऊ शकू. तसे करता यावे; म्हणून आताच साधना वाढवणे आवश्यक आहे. – डॉ. आठवले (चैत्र कृष्ण पक्ष ५, कलियुग वर्ष ५११५ (३०.४.२०१३))

Leave a Comment