सांप्रदायिक साधनेने जलद प्रगती न होण्याचे कारण

व्हिटामिन ए, बी, सी, डी यांपैकी, तसेच लोह, कॅल्शियम इत्यादी धातूंपैकी जे कमी असेल, ते घ्यायला आधुनिक वैद्य (डॉक्टर) सांगतात. तसेच ज्या देवतेचे तत्त्व कमी असेल किंवा ज्या साधनामार्गाने साधना करणे आवश्यक असेल, त्यानुसार उपासना करायची असते. हे ज्ञात नसल्याने सांप्रदायिक साधना करणारे सर्वजण एकच उपासना करतात. असे करणे हे एखाद्या आधुनिक वैद्यांनी सर्व रुग्णांना एकच औषध दिल्यासारखे आहे. यामुळे सर्व रुग्ण बरे होत नाहीत, ज्यांना ते औषध आवश्यक आहे, असे थोडेच बरे होतात. तसेच सांप्रदायिक साधनेने फारच थोड्यांची प्रगती होते. व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग हा अध्यात्मातील सिद्धांत असल्यामुळेच श्रीकृष्णानेही गीतेत कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग, ध्यानयोग इत्यादी सर्व योग सांगितले आहेत. हे लक्षात घेऊन अध्यात्मातील अधिकारी व्यक्ती सांगतील, ती साधना करणे लाभदायक ठरते.
बर्‍याच कुटुंबांत अनुवांशिक वैशिष्ट्यांप्रमाणे सांप्रदायिक साधना सुरू असते. तेही बहुतेकांच्या संदर्भात मानसिक स्तरावरचे असते. त्याचा आध्यात्मिक लाभ विशेष होत नाही.

– डॉ. आठवले (आषाढ शुक्ल पक्ष १, कलियुग वर्ष ५११५ (९.७.२०१३))

Leave a Comment