विज्ञानाला कोणत्याही गोष्टीच्या कार्यकारणभावातील फक्त वरवरचा आणि वर्तमानकाळातील, म्हणजे फारतर १ लक्षांश एवढाच भाग कळतो. याचे कारण हे की, विज्ञानाला आधीचे जन्म, प्रारब्ध इत्यादी काही ज्ञात नसते. त्यामुळे विज्ञानाने सांगितलेली उपाययोजना फारच वरवरची असते. ती मुळापर्यंत जाऊन उपाय करू शकत नाही. एखाद्याला क्षयरोगामुळे खोकला येत असला, तर त्याला केवळ खोकल्याचे औषध देणे जितके हास्यास्पद ठरेल, तितके विज्ञान सर्वच क्षेत्रांत हास्यास्पद ठरते. याउलट साधना करून संत झालेल्यांना आधीचे जन्म, प्रारब्ध, म्हणजे भूतकाळ, भविष्यकाळ इत्यादी सर्व विषय ज्ञात असल्यामुळे ते केवळ उपाय सांगतात, असे नाही, तर प्रतिबंधात्मक उपायही सांगू शकतात. म्हणजेच अध्यात्मात मूळ कारणावर उपाय केले जातात.
विज्ञानाचे दुसरे थिटेपण हे की, विज्ञान फक्त थोड्याफार प्रमाणात दुःख-निवारण आणि सुखप्राप्ती करून देऊ शकते, तर अध्यात्म चिरंतन आनंदाची प्राप्ती करून देते.
अशा विज्ञानाची थोरवी गाणारे किती अंधश्रद्ध किंवा अज्ञानी आहेत, हे लक्षात येते !
– डॉ. आठवले (७.११.२०१३)