निवडणुका आल्या की, सर्वच राजकीय पक्ष अन्न, पाणी, शिक्षण, घर इत्यादींसंदर्भात मोठमोठी आश्वासने देतात आणि विकास करू या शब्दाचा भूलभुलैया दाखवतात. सर्वसामान्य जनताच नाही, तर सुशिक्षितही त्याला भुलतात. त्यामुळेच स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या ६६ वर्षांत जनता देशोधडीला गेली आहे. जनतेला भौतिक, शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक अशा सर्व तर्हेच्या समस्या भेडसावत आहेत.
स्वातंत्र्योत्तर काळात जनतेला साधनेला लावले असते, तर एव्हाना सर्वत्रच्या सात्त्विकतेमुळे कोणतीच समस्या उरली नसती, भारतात रामराज्य अनुभवता आले असते. यालाच व्यक्तीचा आणि राष्ट्राचा खरा विकास झाला, असे म्हणता आले असते.
– डॉ. आठवले (वैशाख शुक्ल पक्ष १, कलियुग वर्ष ५११५ (११.५.२०१३))