अध्यात्मातील अधिकारी व्यक्तींना अहंभाव नसतो. त्यामुळे त्यांची बुद्धी विश्वबुद्धीशी एकरूप होऊन त्यांना स्थूल आणि सूक्ष्म, म्हणजे पंचज्ञानेंद्रियांना समजणारे आणि त्यांच्या पलिकडील अशा दोन्ही प्रकारचे ज्ञान होते. याउलट बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मला सर्व कळते हा अहंभाव असतो. त्यामुळे त्यांना एका विषयाचेही परिपूर्ण ज्ञान नसते. या अहंभावामुळेच त्यांची अधोगती होते. – डॉ. आठवले (३१.८.२०१३)