सनातनच्या ग्रंथांतील सूक्ष्म-परिक्षणात काही ठिकाणी शांतीच्या लहरी, असा उल्लेख असतो. शांती निर्गुणाशी संबंधित असतांना शांतीच्या लहरी कशा असतील ?, असे काही जणांना वाटते. ते योग्यही आहे. प्रत्यक्षात निर्गुणाच्या स्थितीला गेल्यावर, म्हणजे अद्वैतात गेल्यावर शांतीची अनुभूती आली, असे सांगणाराही उरत नाही. शांतीच्या लहरी, असा उल्लेख असतो, तो ३० टक्क्यांहून अधिक शांती अनुभवणार्या साधकांना आलेला अनुभव असतो. त्यांना शांती बाहेरून आत येत आहे किंवा आत निर्माण होत आहे, अशा तर्हेची अनुभूती येते. त्यामुळे ते चैतन्य आणि आनंद यांच्या लहरींप्रमाणे शांतीच्या लहरी, असा उल्लेख करतात. – डॉ. आठवले (चैत्र कृष्ण पक्ष चतुर्दशी, कलियुग वर्ष ५११५ (८.५.२०१३))
शांतीच्या लहरी संदर्भात स्पष्टीकरण
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
- ‘प्रार्थना’ ही देवाप्रती भाव निर्माण करण्याचे माध्यम !
- नामजपाचे महत्त्व !
- प्रत्येक गोष्टीचा कर्ता-करविता असलेल्या देवालाच क्षुल्लक समजणारे बुद्धीप्रामाण्यवादी !
- अध्यात्म हे कृतीचे शास्त्र असल्यामुळे केवळ साधनेचा विचार न करता प्रत्यक्ष साधना केल्यासच मनावर साधनेचा...
- इतरांना सात्त्विकतेचा लाभ व्हावा, यासाठी दैनंदिन कृती नामजपासह करा !
- साधकांनो, सर्वस्वाचा त्याग भावनेपोटी नाही, तर भावाच्या स्तरावर करावा !