१. संभाव्य पाऊले
१ अ. पंढरपूरला विठ्ठलाच्या मूर्तीच्या पूजेचे चित्रीकरण करून त्यावरून नवीन पुजार्यांना पूजा कशी करायची, हे सरकार शिकवणार आहे. असे करणे हे शस्त्रक्रिया कशी करायची, याची चित्रफीत दाखवून शल्यविशारद तयार करणे यासारखे हास्यास्पद आहे. पूजेत केवळ शारीरिक क्रिया नसून ती भावाच्या स्तरावरची कृती आहे. भक्तीने भक्तीभाव जागृत झाल्यावरच खरी पूजा होते. घरची किंवा मंदिरातील पूजा भक्तीभावानेच करायची असते.
१ आ. पुढे पुजार्यांच्या नेमणुकीत राखीव जागा असतील !
२. परिणाम : मंदिरांतील उरलेसुरले पावित्र्य नष्ट होऊन मंदिरे सरकारी कार्यालयाप्रमाणे रज-तमप्रधान बनतील. – डॉ. आठवले (२३.१.२०१४)