१. देवाकडे काही मागणे : आपली पात्रता असल्याशिवाय देव काही देत नाही. असे असतांना देवाला प्रार्थना कशाला करायची ?, असे काही जणांना वाटते. याचे उत्तर असे की, प्रार्थनेमुळे नम्रता निर्माण होण्यास साहाय्य होते. प्रार्थनेच्या जोडीला इतर साधना केल्यास पात्रता निर्माण होते. मग देव पाहिजे ते देतो.
२. देवाकडे काही न मागणे : पात्रता असलेले देवाकडे काही मागत नाहीत; कारण आवश्यक आहे, ते देव देणारच आहे, अशी त्यांची श्रद्धा असते.
– डॉ. आठवले (२.९.२०१३)