सत्ययुगात कायदेच नव्हते, म्हणजे त्यांची आवश्यकताच नव्हती; कारण प्रत्येक जण नीतीवान होता. त्रेतायुगात थोडेफार कायदे होते; पण त्यांची आवश्यकता फारच अल्प होती. द्वापरयुगापासून कलियुगापर्यंत कायद्यांची संख्या वाढत गेली आहे. प्रत्यक्षात कितीही कायदे केले आणि कायद्यांनुसार कितीही कडक शिक्षा केल्या, तरी त्यांचा गुन्हेगारांवर काहीही परिणाम होत नाही, हे पुनःपुन्हा तेच गुन्हे करणार्यांवरून सिद्ध झाले आहे. धर्मशिक्षणाच्या अभावी समाज नीतीमत्ताशून्य झाला आहे. कायद्याने नीतीमत्ता शिकवता येत नाही, हेही राज्यकर्त्यांना कळत नाही. यासाठीचा एकमेव उपाय आहे समाजाला धर्मशिक्षण देणे. सनातन संस्था, हिंदु जनजागृति समिती आणि इतर धार्मिक संस्था धर्मशिक्षण देतात. त्यांच्यामुळे समाज नीतीवान होईल, त्यामुळे गुन्हे होणार नाहीत आणि पुढे कायद्यांची आवश्यकताच रहाणार नाही. – डॉ. आठवले (३.९.२०१३)