हिंदु धर्माचा अभ्यास आणि साधना नसल्याने हिंदूंना धर्माचे महत्त्व कळत नाही. त्यामुळे कोणी हिंदु राष्ट्राची स्थापना करा. हिंदु धर्माचा जगभर प्रसार करा, असे म्हणत नाही. आजार्याला औषधाचे महत्त्व कळते. औषधांहून हिंदु धर्म अनंत पटींनी श्रेष्ठ आहे. औषधे केवळ काही वेळा आजार बरा करतात; पण मृत्यूपासून सुटका करू शकत नाहीत. याउलट धर्म भवरोगातून, म्हणजे जन्म-मृत्यूच्या आजारातून कायमचे मुक्त करतो. हे हिंदूंना कळण्यासाठी धर्मशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे. – डॉ. आठवले (आषाढ शुक्ल पक्ष ६, कलियुग वर्ष ५११५ (१४.७.२०१३))