साधनेत तन-मन-धनाचा त्याग केला की झाले, असे बर्याच ६० टक्क्यांहून अधिक पातळीच्या साधकांना आणि काही संतांनाही वाटते. त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, साधनेत पुढे जायची तळमळ, जिज्ञासा, शिकण्याची वृत्ती, प्रीती आणि समष्टीतील नेतृत्व इत्यादी गुणही अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यांच्याशिवाय पुढील प्रगती होणे अशक्य आहे. एवढेच नव्हे, तर या गुणांशिवाय अधोगतीही होऊ शकते. – डॉ. आठवले (ज्येष्ठ कृष्ण पक्ष १३, कलियुग वर्ष ५११५ (६.७.२०१३))