हिंदूंनी धर्माचरण केले नाही, साधना केली नाही, तर त्यांना इतर पंथियांपेक्षा (धर्मियांपेक्षा) अधिक शिक्षा भोगावी लागते; कारण खरा धर्म ज्ञात असूनही त्यांनी त्याचे पालन केलेले नसते. इतर पंथियांना धर्म म्हणजे काय ? हेच ज्ञात नसल्याने त्यांच्याकडून अज्ञानापोटी ज्या चुका होतात, त्यासाठी त्यांना हिंदूंपेक्षा अल्प शिक्षा भोगावी लागते. देशातील नियम ज्ञात असूनही त्याचे पालन न केल्यास अधिक शिक्षा होते, तर देशात नवीन आलेल्याला नियम ज्ञात नसल्यामुळे त्याच्याकडून त्याचे पालन न झाल्यास त्याला अल्प शिक्षा होते. तसेच धर्माचरण करण्याच्या संदर्भात होणार्या चुकीचे आहे. – डॉ. आठवले (ज्येष्ठ शुक्ल पक्ष १४, कलियुग वर्ष ५११५ (२२.६.२०१३))