देवळांतील पुजारी तेथील मूर्तीच्या सहवासात वर्षानुवर्षे सातत्याने असल्यामुळे बहुतेकांच्यात यांत्रिकपणा येतो. अतिपरिचयात् अवज्ञा । म्हणजे अतिपरिचयामुळे अनादर होतो या सिद्धांतानुसार त्यांच्याकडून मूर्तीच्या संदर्भात असे होते. याउलट देवळात दर्शनासाठी आलेल्या काही भक्तांचा क्षणभरच्या दर्शनानेही भाव जागृत होतो. पुजारी असल्याचा स्वतःला लाभ व्हावा; म्हणून त्यांंनी आई-वडिलांची सेवा वर्षानुवर्षे यांत्रिकपणे न करणार्या श्रावणाचा आदर्श समोर ठेवला पाहिजे. श्रावण अमर झाला, तसेच पुजार्यांनी पूजा मनापासून आणि भावपूर्ण केली, तर त्यांनाही नित्यनूतन किंवा आनंददायी अनुभूती येतील आणि त्यामुळे त्यांचा पूजेतील यांत्रिकपणा निघून जाईल. – डॉ. आठवले (२१.२.२०१४)