साधनेत केवळ तन, मन आणि धन यांचा त्याग पुरेसा नाही. अहंचा त्याग महत्त्वाचा असतो. अहंचा त्याग करणे अत्यंत कठीण असल्यामुळे सुरूवातीला तन, मन आणि धन यांचा त्याग करण्यास सांगितले जाते. त्यांचा त्याग केला, तरी मी त्याग केला, असा अहं रहातो. त्याचबरोबर काही स्वभावदोषही रहातात. यासाठी साधनेत तन, मन आणि धन यांच्या त्यागापेक्षा स्वभावदोष आणि अहं यांचा त्याग अधिक महत्त्वाचा असतो. स्वभावदोष आणि अहं यांचा त्याग केल्यावर तन, मन आणि धन यांचा त्याग केला किंवा नाही केला, तरी ते सारखेच असते. जनकादि राजांच्या उदाहरणांवरून हे लक्षात येते. – डॉ. आठवले (वैशाख शुक्ल पक्ष १, कलियुग वर्ष ५११५ (११.५.२०१३))