‘नोकरी किंवा धंदा करणार्या भ्रष्टाचार्याची मासिकप्राप्ती त्याच्या कुटुंबियांना ज्ञात असते. एखादा मासिकप्राप्तीपेक्षा अधिक पैसे घरी आणायला लागला किंवा खर्च करू लागला, तर त्याचा निष्कर्ष एकच असतो आणि तो म्हणजे ‘ती व्यक्ती भ्रष्टाचार करून पैसे मिळवत आहे. तिच्या पापाच्या पैशांचा उपभोग घेणे, हे पाप आहे, तर तिचा गुन्हा उघडकीस आणणे, हे पुण्य आहे आणि समष्टी साधनाही आहे. यासाठी प्रत्येकानेच आपले कुटुंबीय, शेजारी, कार्यालयात काम करणारे इत्यादी भ्रष्टाचार करत आहेत, हे लक्षात आल्यावर लगेच त्याविरूद्ध तक्रार दाखल करा आणि तिची एक प्रत सनातन प्रभातलाही पाठवा.
सनातन प्रभातचा संपर्क क्र. – (०८३२) २३१२६६४’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२८.११.२०१६)