सध्याच्या काळात दूरचित्रवाहिन्यांवरील बर्याच कार्यक्रमांत, तसेच चित्रपटांतही कौटुंबिक कलह, एकमेकांविषयी ईर्षा आणि सूडभावना, स्वतःची पत्नी असतांनाही परस्त्रीसह प्रेमसंबंध इत्यादी दाखवले जाते. अशा नीतीशून्य, अविवेकी आणि संस्कृतीद्रोही कार्यक्रमांचा परिणाम मोठ्यांसह लहानांवरही होतो. याला कारणीभूत असणार्या दूरचित्रवाहिन्या, चित्रपट-निर्माते आदींसह घराघरांत असे कार्यक्रम पहाणारे आणि लहानांनाही ते पाहू देणारे स्वतःच्याच हाताने स्वतःचे पाप वाढवत असून राष्ट्रालाही अधःपतित करत आहेत. शासनव्यवस्था धर्माधिष्ठित नसल्याचाच हा परिपाक आहे. भावी हिंदु राष्ट्रात केवळ नीतीमत्ता, संस्कृतीनिष्ठता, धर्म आणि साधना यांचे संस्कार करणारे कार्यक्रमच दूरचित्रवाहिन्यांवर आणि चित्रपटांत दाखवले जातील.