आपण मायेतील ब्रह्माला जवळ करत नाही, तर मायेशी संवाद साधतो. आपण मायेच्या मूळ रूपाला जाणत नाही, उदा. आश्रमातील जांभळे खातांना ती ज्याच्यामुळे मिळाली त्याची जाणीव आणि त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा विचार आपल्या मनात येत नाही. ज्या झाडाने जांभळे दिली त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली, तर झाड आणि जांभळे काढून देणारा हे दोघेही प्रसन्न होतील.