सती आणि हुंडाबळी यांचा संबंध काय ? सतीची घटना १०० वर्षांत एखादीच घडते आणि हुंडाबळी हे प्रकरण इंग्रजी राज्य आणि इंग्रजी शिक्षण आल्यानंतर चालू झाले. इंग्रजी शिक्षणाने निर्माण केलेल्या आधुनिक पाश्चात्त्य प्रणालींच्या चैनी, ऐषारामी जीवनाची ओढ, व्यक्तीस्वातंत्र्य, सनातन हिंदु धर्म परंपरा-रुढी-रिवाज यांकडे तुच्छतेने पहाण्याची वृत्ती, मुलींचे वाढते वय (म्हणजे २८ ते ३२ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक), इंग्रजी जीवनरहाटीचा आणि शिक्षणाचा प्रभाव, आधुनिक टेक्नॉलॉजी आणि त्याकरता लागणारा प्रचंड पैसा, तो फुकट मिळवा म्हणून सून वा पत्नीचा छळ, यामुळे आत्महत्या आणि हुंडाबळी सतत घडत आहेत. इंग्रजी शिक्षण आणि इंग्रज यांच्यापासून आम्ही दूर होतो. त्या काळात हुंडाबळी हा प्रकारच नव्हता. ख्रिश्चन स्कॉलर J.N. Farqluhar त्यांच्या Modern Religions Movement या ग्रंथात लिहितात, The evil seems to be largely a result of the progress of western education.’’ (ख्रिस्ती विद्वान जे.एन्. फार्क्लूहर त्यांच्या ‘मॉडर्न रिलीजन्स मूव्हमेंट’ या ग्रंथात लिहितात, ‘‘पाश्चात्त्य शिक्षण जसजसे वाढत गेले, तशी वाईट कर्मेही मोठ्या प्रमाणात बळावत गेली.’’)
– प.पू. गुरुदेव डॉ. नारायणनंदनाथ काटेस्वामीजी
(संदर्भ : ‘लाव्हा’, पृ. १२४ अन् १२५)