कृष्णाने गीतेच्या ११ व्या अध्यायात सांगितलेले आहे. ‘हे पहा, युद्ध झालेलेच आहे. फळ मिळालेले आहे.’ आरंभीच त्याने इतिश्री सांगून टाकली, तरीपण युद्ध करतांना आलेल्या अडचणींना तोंड देण्यासाठी तो सारथी झाला.
आपल्याला योगेश्वराचा (प.पू. डॉक्टरांचा) आधार आहे. त्यामुळे आपल्याला भिण्याचे कारण नाही. त्यांनी ‘हिंदु राष्ट्र येणार आहे’, हे सांगूनच टाकले आहे, तरीपण येणार्या काळासाठी तोंड देण्याला आपण कमी पडू नये; सक्षम व्हावे; म्हणून ही सतर्कता ! येथे फळाची आशा नाही. फळ मिळालेलेच आहे; म्हणून निष्काम कर्माने आपली गती चांगली व्हावी, आपले कल्याण व्हावे, मोक्षप्राप्ती व्हावी, या उद्देशानेच त्या त्या वेळी आपल्याला कर्म करायचे आहे.’
– प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२४.४.२०१५)