‘कोणत्याही कर्माचे फलित हे मायेतील असल्यामुळे ते क्षणिक असते. भगवंतप्राप्तीचे कर्म हे कायमस्वरूपी असल्याने ते शाश्वत आहे; म्हणून ज्यांनी निष्काम भावनेने सेवा केली, ते कायम आहेत. संतच निष्काम भावाने सेवा करू शकतात. त्यामुळे त्यांची सेवा कायम आहे. जे व्यापारी आहेत, कोट्यधीश झाले, त्यांच्यापैकी एकाचेही नाव इतिहासात येत नाही. तसेच राजकीय लोकांची वा अशा राजांचीही नावे नाहीत. याउलट ज्यांनी जनकल्याणाच्या दृष्टीने निष्काम होऊन कार्य केले, त्यांचीच नावे इतिहासात सापडतात.’
-प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.