साधना म्हणजे काय ?

१. ‘लोकांना ‘साधना म्हणजे काय ?’, हे समजले नाही. व्यवहारातील काही न करणे आणि केवळ भगवंताच्या अनुसंधानात रहाणे, एवढेच कार्य करणे म्हणजे साधना ! भगवंतच सर्व करत आहे, करवून घेत आहे, तुम्हाला काहीच करायचे नाही.

२. प्रत्येक कर्म ही साधना आहे. ‘प्रत्येक कर्म करतांना साधकाचा प्रत्येक क्षण साधनेत जावा’, हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा उद्देश आहे. भगवंताविना दुसरा विचार नाही, म्हणजे साधना !

३. मायेचे आवरण काढून आत्म्याची अनुभूती घेणे, ही साधना आहे.’

– प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (६.३.२०१७)

2 thoughts on “साधना म्हणजे काय ?”

    • नमस्कार,

      उपासना ही इच्छित फळ मिळण्यासाठी केलेली देवतेची आराधना. त्यामध्ये देवतांचे उपवास, कर्मकांड, व्रत-वैकल्ये यांच्याशी संबंधित आहे. उपासना व्यावहारिक उन्नतीसाठी अथवा अडचणी सोडवण्यासाठी केलेली असू शकते. उपासना परंपरे नुसारही करतात.

      साधना म्हणजे मोक्षप्राप्ती अथवा ईश्वरप्राप्ती, हे ध्येय ठेवून केलेले नियमित व्यष्टी आणि समष्टी प्रयत्न. साधक हा नियमित साधना गुरूंचा मार्गदर्शना खाली करतो. साधना आध्यात्मिक उन्नतीसाठी केली जाते.

      Reply

Leave a Comment