‘२१.५.२०१७ या दिवशी महर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून सांगितले, ‘‘१९.५.२०१७ या दिवशी गुरूंच्या समोर झालेल्या नाडीवाचनात महर्षि म्हणाले, ‘साधकांचा नामजप अल्प पडतो.’ याचा अर्थ काय आहे ? सर्व साधक नामजप तर करतातच. आता तो हनुमंतासारखा व्हायला पाहिजे. त्रेता आणि द्वापर या युगांत हनुमंत होता; पण हनुमंताच्या रोमारोमामध्ये श्रीराम होता. हळूहळू साधकांनी तसा प्रयत्न करायला पाहिजे, म्हणजे आपल्या रोमारोमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे नाव यायला पाहिजे. मग आपत्काळात आपल्या रक्षणासाठी परात्पर गुरु डॉक्टर धावून येतील.’’
– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ (२१.५.२०१७)