‘शिवाला प्राप्त करून घेण्यासाठी देवी सतीला अनेक संकटांचा सामना करावा लागला. प्रभु श्रीरामाला १४ वर्षे खडतर वनवास भोगावा लागला. बालपणातच श्रीकृष्णाचा वध करण्यासाठी कंसाने आणि हनुमानाचा वध करण्यासाठी रावणाने अनेक असुरांना त्यांच्यावर धाडले. संकटे तर देवतांनाही चुकली नाहीत; पण देवता या सार्या संकटांना पुरून उरल्या. संकटांतच आपली श्रद्धा, धैर्य, संयम आणि विवेक यांची खरी परीक्षा होते. देवतांचा आदर्श ठेवून आपणही संकटांना पुरून उरूया. जीवनात सततच्या संकटांचा सामना करावा लागल्यामुळे समजा आपल्या आध्यात्मिक प्रगतीची उंची शीघ्र गतीने वाढली नाही तरी हरकत नाही; पण आपली श्रद्धा, भाव आणि आत्मबल यांची उंची वाढवूया !’ – (पू.) श्री. संदीप आळशी (१६.१.२०१७)