‘व्यक्तीमध्ये गुण निर्माण झाल्यावर तो गुण तिच्यात सर्व ठिकाणी दिसतो. सेवा कोणतीही असो, उदा. चित्रीकरण करणे किंवा स्वयंपाक बनवणे याची सेवा असू दे. सर्व ठिकाणी गुण सारखेच असतात. त्यामुळे सेवा करतांना नेहमी गुणवृद्धी होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. सेवा होत राहील; पण ती गुणात्मक व्हायला हवी. गुणात्मक सेवा, म्हणजे ईश्वराला अपेक्षित अशी सेवा झाल्यावर आपोआप साधनेत पुढे पुढे जाता येते.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (२९.६.२०२४)