‘नामसाधना असली, तरी नामाच्या समवेत आपल्यातील स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी दिवसभरात प्रयत्न नाही केले, तर आपल्या हातून झालेल्या चुकांच्या निवारणामध्ये नामजपामुळे मिळालेली साधनेची ऊर्जा वाया जाते. असे होऊ नये; म्हणून नामसाधनेच्या समवेतच स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याच्या प्रक्रियेला पुष्कळ महत्त्व आहे. बर्याचदा नुसत्या नामसाधनेने प्रगती होत नाही. समाजात आपण बघतो की, अनेक नामधारक असतात; परंतु त्यांच्याकडे पाहून आपल्याला ‘अहं’ जाणवतो; कारण त्यांचे त्यांच्या स्वभावदोषांकडे लक्ष नसते. ते बर्याचदा लहान लहान घटनांनीही त्रस्त झालेले दिसतात. याउलट स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया नित्य राबवणार्या साधकाचे नामही चांगले होते आणि त्याच्याकडे पाहून आनंदही जाणवतो.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (२४.४.२०२०)