साधकाची जसजशी आध्यात्मिक प्रगती होते, तसतसे त्याच्या जीवनातील सर्वकाही देवाशी जोडले जाऊ लागते. ‘देव एके देव’ एवढेच शेष रहाते. बहुतेक लोक विचारांच्या पातळीला बराच काळ रहातात. त्यांच्याकडून साधनेची कृती होत नाही. केवळ साधनेचा विचार करून चालत नाही, तर त्याप्रमाणे साधना करून अध्यात्म जगावे लागते, तरच मनावर साधनेचा संस्कार होतो; म्हणूनच ‘अध्यात्म हे कृतीचे शास्त्र आहे’, असे म्हटले जाते.
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (२९.४.२०१८)