१. राजकारणातील क्षणभंगुरता
अ. ‘एखादी व्यक्ती सत्तेवर असतांना तिला शासनाच्या वतीने सुख-सुविधा पुरवल्या जातात. त्या व्यक्तीला पोलिसांकडून संरक्षण दिले जाते.
आ. त्या व्यक्तीचा पदाचा कालावधी पूर्ण झाला की, तिला दिलेल्या सुविधा काढून घेतल्या जातात. त्या व्यक्तीवर अकस्मात् पद (सत्ता) सोडण्याची वेळ आली, तर एका रात्रीत तिच्याकडे असलेले दायित्व काढून घेतले जाते आणि दुसर्या व्यक्तीला दायित्व दिले जाते.
इ. राजकारणात क्षणिक सुख असते.
२. अध्यात्मातील शाश्वतता
अ. अध्यात्मात भक्ताची श्रद्धा भगवंतावर असते. भगवंत जे देईल, ते भक्त आनंदाने स्वीकारतो आणि त्यात तो समाधानी असतो.
आ. भक्ताला भगवंताचे संरक्षण असते. त्यामुळे भक्ताला काळाची मर्यादा नसते. भगवंत भक्तांची काळजी भक्त जिवंत असतांना तर घेतोच, तसेच भक्ताच्या मृत्यूनंतरही घेतो. भक्ताला पुढच्या लोकांत घेऊन जाण्याचे (पुढची गती देण्याचे) दायित्व भगवंत घेतो.
इ. अध्यात्मात युगानयुगे टिकणारा परमानंद असतो.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ