मासिक पाळीशी संबंधित तक्रारींवरील (Ailments related to menses) होमिओपॅथी औषधांची माहिती

Article also available in :

अनुक्रमणिका

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कुणालाही आणि कधीही संसर्गजन्य आजारांना वा अन्य कोणत्याही विकारांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी पटकन कधीही तज्ञ वैद्यकीय सल्ला उपलब्ध होऊ शकेलच, असे सांगता येत नाही. सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब, बद्धकोष्ठता, आम्लपित्त अशा विविध आजारांवर घरच्या घरी उपचार करता यावेत, या दृष्टीने होमिओपॅथी चिकित्सापद्धत सर्वसामान्यजनांना अत्यंत उपयोगी आहे. ही उपचारपद्धती घरच्या घरी कशी अवलंबवावी ? होमिओपॅथीची औषधे कशा प्रकारे सिद्ध करावीत ? त्यांची साठवणूक कशी करावी ? अशा अनेक गोष्टींची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.

प्रत्‍यक्ष आजारांवर स्‍वउपचार चालू करण्‍यापूर्वी ‘होमिओपॅथी स्‍वउपचाराविषयीची मार्गदर्शक सूत्रे आणि प्रत्‍यक्ष औषध कसे निवडायचे ?’, याविषयीची माहिती वाचकांनी आधी वाचून समजून घ्यावीत आणि त्यानुसार प्रत्यक्ष औषधे निवडावीत, ही विनंती !

संकलक : डॉ. प्रवीण मेहता, डॉ. अजित भरमगुडे आणि डॉ. (सौ.) संगीता अ. भरमगुडे

मासिक पाळीशी संबंधित विविध प्रकारच्या तक्रारींना स्त्रियांना सामोरे जावे लागते. यातील काही प्रमुख तक्रारींच्या उपचारांच्या संदर्भातील माहिती पुढे दिली आहे. कोणती वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे असली की, ते औषध घ्यावे, हे औषधांच्या नावापुढे दिले आहे.

 

होमिओपॅथी वैद्य (डॉ.) प्रवीण मेहता

१. मासिक पाळीच्या आधी असलेल्या तक्रारी

१ अ. फॉस्फोरम् ॲसिडम् (Phosphorum Acidum)

१ अ १. पोटदुखी, अंगावर पांढरे जाणे आणि मनाची स्थिती रडवेली असणे

१ अ २. हिरड्या, तसेच गाल यांना सूज येणे

१ अ ३. शरिरावर असणार्‍या व्रणांमधून (ulcers मधून) रक्तस्राव होणे

१ आ. कल्केरिया कार्बाेनिकम् (Calcarea Carbonicum)

१ आ १. चक्कर येणे

१ आ २. जीभेला आंबट चव येणे

१ आ ३. थुंकीतून थोडे रक्त पडणे

१ इ. नेट्रम् म्युरियाटिकम् (Natrum Muriaticum)

१ इ १. स्तनांमध्ये वेदना होणे

१ इ २. रक्तस्राव लवकर आणि पुष्कळ प्रमाणात होणे

१ ई. कोनियम मॅक्युलेटम् (Conium Maculatum)

स्तनांमध्ये वेदना होणे आणि रक्तस्राव अतिशय अल्प प्रमाणात होणे

१ उ. ग्रॅफायटीस (Graphites)

योनीमार्गामध्ये खाज सुटणे

१ ऊ. व्हेराट्रम् आल्बम् (Veratrum Album)

मासिक स्राव चालू होण्यापूर्वी मळमळ किंवा जुलाब होणे

१ ए. क्रियोसोटम् (Kreosotum)

मासिक स्राव चालू होण्याच्या काही दिवस अगोदर अस्वस्थ आणि चिडचिड होणे

१ ऐ. मॅग्नेशियम म्युरियाटिकम् (Magnesium Muriaticum)

मासिक स्राव चालू  होण्याच्या एक दिवस आधी पुष्कळ चिडचिड होणे

१ ओ. सेपिया ऑफिसिनॅलिस (Sepia Officinalis)

मासिक स्राव चालू होण्यापूर्वी नैराश्य येणे

१ औ. लायकोपोडियम क्लॅव्हॅटम् (Lycopodium Clavatum)

मासिक स्राव चालू होण्यापूर्वी विषण्णता येऊन प्रत्येक गोष्टीला विरोध करणे

१ अं. कॉस्टिकम् (Causticum)

मासिक स्राव चालू होण्यापूर्वी प्रत्येक गोष्टीची नकारात्मक बाजू पहाणे

१ क. कॅमोमिल्ला (Chamomilla)

मासिक स्राव चालू होण्यापूर्वी विचित्रपणे वागणे

डॉ. (सौ.) संगीता अ. भरमगुडे

२. मासिक पाळीच्या पूर्वी आणि चालू असतांना असलेल्या तक्रारी

२ अ. ग्रॅफायटीस (Graphites)

कोरडा खोकला, तसेच घाम येणे

२ आ. लिथियम कार्बाेनिकम् (Lithium Carbonicum)

हृदयाच्या ठिकाणी वेदना होणे

 

३. मासिक पाळी चालू असतांनाच्या तक्रारी

३ अ. ग्रॅफायटीस (Graphites)

३ अ १. मासिक पाळी चालू असतांना आवाज घोगरा होणे आणि सर्दी-ताप येणे

३ अ २. अंग थरथरणे

३ आ. बोरॅक्स (Borax)

मासिक पाळी चालू असतांना दोन्ही मांड्यांच्या सांध्यांच्या मध्ये (groin मध्ये) वेदना होणे

डॉ. अजित भरमगुडे

४. मासिक पाळीच्या आधी किंवा दोन पाळ्यांच्या मधील कालावधीत स्त्रियांच्या पोटात दुखणे (Dysmenorrhoea)

काही स्त्रियांना मासिक पाळी चालू व्हायच्या १-२ दिवस आधी पोटात दुखू लागते आणि पाळी चालू झाल्यावर २-३ दिवसांनी ते आपोआप थांबते. या कालावधीत पोटात पेटके (cramps) येतात. काहींना मळमळ, थकवा किंवा जुलाब होतात. मासिक पाळीच्या वेळी सामान्यतः आढळणारे पोटात दुखणे, हे कोणत्याही वैद्यकीय आजारामुळे नसते.

४ अ. कॉलोफायलम् थॅलिकट्रॉयडेस (Caulophyllum Thalictroides)

४ अ १. पोटामध्ये मधून मधून तीव्र कळा येणे

४ अ २. आतडी खाली येत आहे, असे वाटणे

४ अ ३. वेदना गर्भाशयाकडून भोवतालच्या इतर इंद्रियांकडे जाणे

४ आ. कॅमोमिल्ला (Chamomilla)

४ आ १. अतिशय तीव्र अशा प्रसुतीप्रमाणे वेदना होणे

४ आ २. वेदना सहन न होणे, वेदनेच्या बरोबर बधिरता जाणवणे

४ आ ३. पोटाच्या वरच्या बाजूला दाब जाणवून अंगावर रक्ताच्या गाठी पडणे.

Discharge per vagina याला मराठीत ‘अंगावर जाणे’, असे म्हणतात, उदाहरणार्थ मासिक पाळीच्या वेळी पुष्कळ रक्तस्राव होत असल्यास ‘अंगावर पुष्कळ जात आहे’, असे म्हणतात.

४ आ ४. उष्ण हवामानामध्ये त्रासात वाढ होणे

४ इ. पल्सेटिल्ला निग्रिकन्स (Pulsatilla Nigricans)

४ इ १. कळा काही वेळा एका भागामध्ये, तर लगेचच दुसर्‍या भागामध्ये जाणवणे

४ इ २. वेदनांबरोबर थंडी वाजणे; जेवढ्या अधिक वेदना, तेवढी अधिक थंडी वाजणे

४ इ ३. मासिक पाळी उशिरा येणे किंवा दबली जाणे, मुख्यत्वे पाय ओले केल्याने रक्तस्राव बंद होणे

४ इ ४. मासिक पाळीच्या वेळी वेदना होऊन फार थोडे अंगावर जाणे आणि त्या वेळी जुलाब होणे

४ इ ५. स्त्री ‘कोमल, मृदु, नमते घेणारी, दुःखी, निराश, लवकर रडू येणारी, प्रत्येक वेळी रडणारी, प्रत्येक तक्रार रडत सांगणारी’, अशी असणे

४ इ ६. वेदना, थंडी, शौच इत्यादींच्या लक्षणांच्या स्वरूपांमध्ये सतत पालट होणे

४ इ ७. इतरांनी सहानभूती दाखवावी, असे वाटणे

४ ई. मॅग्नेशियम फॉस्फोरिकम् (Magnesium Phosphoricum)

४ ई १. पाळीचा स्राव चालू होण्यापूर्वी मज्जातंतूगत (neuralgic) वेदना होणे, तसेच पेटके (cramps) येणे

४ ई २. पोटामध्ये प्रामुख्याने उजव्या बाजूला वेदना होणे

४ ई ३. शेकल्याने, पुढे वाकल्याने आणि दाब दिल्याने बरे वाटणे. हालचाल केल्याने वेदनांमध्ये वाढ होणे

४ ई ४. कंटाळलेल्या, सुस्त आणि थकलेल्या स्त्रियांमध्ये पाळीचा त्रास असल्यास उपयुक्त

पोटामध्ये वेदना होणे

४ उ. ॲकोनाईट नॅपेलस (Aconite Napellus)

४ उ १. धडधाकट, गुलाबी चेहरा (plethoric) असलेल्या स्त्रियांमध्ये पाळीच्या वेळी असह्य वेदना होणे

४ उ २. अचानक भीती वाटून अस्वस्थ होणे, काळजी वाटणे

४ उ ३. मरणाची भीती वाटणे, मृत्यूची नेमकी वेळही सांगणे

४ ऊ. कॅक्टस ग्रँडिफ्लोरस् (Cactus Grandiflorus)

४ ऊ १. पोटामध्ये अतिशय भयानक वेदना होणे

४ ऊ २. वेदनांमुळे रुग्ण मोठ्याने रडणे

४ ऊ ३. रुग्ण पुरते गळून जाणे

४ ए. कोलोसिंथिस (Colocynthis)

४ ए १. पोटामध्ये भयंकर कळा येणे, आतडी दगडाखाली चेचल्या गेल्या आहेत, असे वाटणे

४ ए २. वेदनांमुळे अगदी वाकून जायला होणे

४ ए ३. रुग्ण तळमळून विव्हळत असणे

४ ए ४. रुग्णाला पोट हातांनी दाबून धरून वाकले असता बरे वाटणे

४ ऐ. व्हायबरनम् ऑप्यूलस (Viburnum Opulus)

४ ऐ १. मधून मधून पोटामध्ये कळा येणे, त्याबरोबर पोटामध्ये पेटके (cramps) येणे

४ ऐ २. वेदनांबरोबर पोटामध्ये वायू होऊन मोठे ढेकर येणे

४ ओ. सेपिया ऑफिसिनॅलिस (Sepia Officinalis)

४ ओ १. गर्भाशय खाली ओढल्याप्रमाणे जाणवणे

४ ओ २. सर्व अवयव योनीतून बाहेर येत आहेत की काय, असे वाटणे आणि त्यामुळे कात्रीप्रमाणे पायावर पाय घालून बसणे किंवा तो भाग हाताने धरून ठेवणे भाग पडणे

४ ओ ३. मासिक स्राव अतिशय अल्प असणे

४ औ. ब्रायोनिआ (Bryonia)

४ औ १. मासिक पाळीच्या वेळी मासिक स्रावाच्या ऐवजी नाकातून रक्तस्राव होणे

५. मासिक स्राव अधिक असणे (Menorrhagia)

काही स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी अधिक प्रमाणात आणि अधिक दिवस योनीमार्गातून रक्तस्राव होतो. ७ दिवसांपेक्षा अधिक आणि नेहमीच्या तुलनेत अधिक प्रमाणात रक्तस्राव होणे, याला ‘मासिक स्राव अधिक असणे’, असे म्हणतात. मासिक स्राव अधिक होत असल्यास निर्जलीकरण रोखण्यासाठी ‘जलसंजीवनी’ (ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन (ओ.आर्.एस्.)) द्यावे. जलसंजीवनी, हे पाणी आणि ‘इलेक्ट्रोलाईट’ यांचे मिश्रण आहे. बाजारात ‘ओ.आर्.एस्.’ची सिद्ध पाकिटे मिळतात; परंतु ती उपलब्ध नसल्यास उकळून थंड केलेल्या १ लिटर पाण्यामध्ये ६ चमचे साखर आणि अर्धा चमचा मीठ मिसळून आपण ‘जलसंजीवनी’ द्रावण सिद्ध करू शकतो. अधिक रक्तस्राव झाल्यामुळे पंडुरोग (anaemia) होऊन थकवा येऊ शकतो. अशा वेळी रक्तवाढीसाठी लोहाच्या गोळ्या (iron tablets) घेणे आवश्यक असते.

५ अ. बोरॅक्स (Borax)

५ अ १. मासिक स्राव अपेक्षित वेळेच्या पुष्कळ अगोदर चालू होऊन त्याचे प्रमाण पुष्कळ जास्त असणे

५ अ २. मासिक स्रावासह पोटामध्ये कळा येऊन मळमळणे

५ आ. कल्केरिया कार्बाेनिकम् (Calcarea Carbonicum)

५ आ १. मासिक पाळी अपेक्षित वेळेच्या पुष्कळ अगोदर चालू होणे, स्रावाचे प्रमाण पुष्कळ अधिक असणे आणि स्राव अनेक दिवस चालू रहाणे

५ आ २. रुग्ण स्थूल; परंतु निस्तेज (pale) असणे

५ आ ३. पाय ओलसर आणि थंडगार पडणे

५ इ. एलो सोकोट्रिना (Aloe Socotrina)

५ इ १. मासिक पाळी अपेक्षित वेळेच्या पुष्कळ अगोदर चालू होणे, स्रावाचे प्रमाण पुष्कळ अधिक असणे आणि स्राव अनेक दिवस चालू रहाणे

५ इ २. प्रसूतीच्या वेळी होतात त्याप्रमाणे खालच्या दिशेने ढकलल्याप्रमाणे कळा येऊन गर्भाशय योनीमार्गातून बाहेर येणे

५ इ ३. शौचाला घाई होणे

५ ई. फेरम् मेटॅलिकम् (Ferrum Metalicum)

अन्य काहीही लक्षण नसतांना केवळ मासिक पाळीच्या स्रावाचे प्रमाण अधिक असणे

५ उ. हॅमॅमेलिस (Hamamelis)

५ उ १. मासिक स्राव अधिक असणे

५ उ २. मासिक स्रावाचा रंग गडद असणे

५ उ ३. विशेषतः जर सोबत अंडाशयात वेदना असणे (pain in ovaries)

५ ऊ. चायना ऑफिसिनॅलिस (China Officinalis)

मासिक स्राव अधिक होणे, स्रावामध्ये काळसर गाठी असणे

५ ए. क्रॉकस सटायव्हस (Crocus Sativus)

मासिक स्राव काळा, दाट, जळू प्रमाणे असणे

५ ऐ. थॅलॅप्सी बर्सा पास्टोरिस (Thlapsi Bursa Pastoris)

५ ऐ १. मासिक स्राव पुष्कळ होणे

५ ऐ २. सोबत गाठी पडणे आणि पोटात कळा येणे

५ ऐ ३. दोन मासिक पाळ्यांमध्येही अशक्तपणा भरून न येणे

५ ओ. कॅमोमिल्ला (Chamomilla)

५ ओ १. मनःक्षोभामुळे अतीप्रमाणात मासिक स्राव होणे, त्याबरोबर पुष्कळ चिडचिड होणे

५ ओ २. स्राव गाठी असलेला आणि काळ्या रंगाचा असणे

५ औ. सिकेल कॉरन्युटम् (Secale Cornutum)

५ औ १. मासिक स्राव गडद, रक्त आणि पू मिश्रित, तसेच पातळ असणे

५ औ २. रुग्ण स्त्री ‘कृश आणि वाळलेली’ (thin and cachectic) असणे

५ अं. मॅग्नेशियम कार्बाेनिकम् (Magnesium Carbonicum)

५ अं १. मासिक स्राव पुष्कळ अधिक आणि प्रामुख्याने रात्री अधिक प्रमाणात असणे

५ क. सबिना ऑफिसिनॅलिस (Sabina Officinalis)

५ क १. मासिक स्राव भडक लाल रंगाचा, पुष्कळ आणि मधून मधून होणे

५ क २. चालतांना किंवा उभे असतांना स्राव वाढणे

५ ख. इपिकॅकुआन्हा (Ipecacuanha)

५ ख १. मासिक स्राव पुष्कळ प्रमाणात आणि भडक लाल रंगाचा असणे

५ ख २. या लक्षणासोबत मळमळ असणे किंवा नसणे

५ ग. नायट्रिकम् ॲसिडम् (Nitricum Acidum)

५ ग १. गर्भपातानंतर किंवा मासिक पाळीच्या वेळी पोटामध्ये कळा येऊन पुष्कळ प्रमाणात स्राव होणे

५ ग २. रजोनिवृत्तीच्या (menopause च्या) काळामध्ये ओटीपोटामध्ये खाली ओढल्याप्रमाणे कळा येऊन पाठ, तसेच मांड्यांमध्ये वेदना होणे

५ ग ३. घोड्याच्या मूत्राप्रमाणे लघवीला दुर्गंध येणे

५ ग ४. मध्यरात्रीनंतर अस्वस्थ होणे

५ ग ५. तीव्र पेटके (cramps) येऊन खाली ओढल्याप्रमाणे कळा येणे, त्यानंतर लगेच स्राव होणे

५ ग ६. हिरव्या रंगाचा जळजळणारा श्वेतपदर अंगावरून जाणे (Discharge per vagina याला मराठीत ‘अंगावरून जाणे’, असे म्हणतात, उदा. मासिक पाळीच्या वेळी पुष्कळ रक्तस्राव होत असल्यास ‘अंगावरून पुष्कळ जात आहे’, असे म्हणतात. श्वेतपदर, म्हणजे White discharge per vagina)

५ घ. आर्सेनिकम् आल्बम् (Arsenicum Album)

५ घ १. पुष्कळ काळापासून मासिक स्राव अधिक असणे

५ घ २. पातळ, जळजळणारा श्वेतपदर अंगावरून जाणे

५ च. अँब्रा ग्रिसीया (Ambra Grisea)

मासिक पाळीच्या नंतरही छोट्या छोट्या कारणाने रक्तस्राव होणे

५ छ. युस्टिलॅगो मेडिस (Ustilago Maydis)

मासिक पाळीच्या वेळी पुष्कळ स्राव होणे; त्याआधी आणि त्यानंतर ‘सामान्य रक्तस्राव’ (non-menstrual blood) होणे

‘घरच्या घरी करता येतील असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’, या आगामी ग्रंथातील निवडक भाग प्रत्येक शुक्रवारी लेखाच्या रूपात प्रसिद्ध करण्यात येत आहे. तरी स्वउपचार करण्याच्या दृष्टीने साधक, वाचक, राष्ट्र-धर्मप्रेमी, हितचिंतक, अर्पणदाते यांनी हे लेख आपत्काळाच्या दृष्टीने संग्रही ठेवावेत. आपत्काळात डॉक्टर, वैद्य कुणीही उपलब्ध नसतील, त्या वेळी ही लेखमाला वाचून स्वतःच स्वतःवर उपचार करता येतील.

 

Leave a Comment