प्रस्तुत लेखात आपण ‘ईश्वर’ म्हणजे काय, त्याला कसे संबोधावे यांविषयी वैशिष्ट्यपूर्ण माहिती पाहूया.
१. व्युत्पत्ती आणि अर्थ
ईश्वर · ईशः + वरः आणि ईशः · ईः + शः अ.
`ईः’ – ईक्षते म्हणजे पहातो, म्हणजे सर्व जाणून घेणारा, सर्वज्ञ आणि `शः’ – शमयते म्हणजे शांत, तृप्त करतो. म्हणूनच जो सर्वज्ञ आहे आणि शांती देतो तो म्हणजे ईश. `वरः’ म्हणजे श्रेष्ठ; म्हणून `ईशः’ + `वरः’ · ईश्वरः, म्हणजे जो सर्वज्ञतेत आणि शांती देण्यात श्रेष्ठ आहे तो.
२. काही इतर नावे
२ अ. ईश्वराला काय संबोधावे ?
‘ब्रह्माला पुरुष म्हणावे तर तो व्यालेला आहे, म्हणजे त्याच्या नाभीपासून विश्वाची उत्पत्ती झाली आहे. विष्णूला स्त्री म्हणावे तर त्याला लक्ष्मी लागते. ईश्वराला नंपुसकलिंगी तरी कसे म्हणावे ? तो तर इतके सर्व कार्य करतो. त्याच्यापासून इतके सर्व निर्माण होते. त्याला तुम्ही ‘मी’ म्हणणार का ? त्याला तुम्ही ‘आम्ही’ म्हणणार का ? त्याला तुम्ही ‘तो, ती, ते’ म्हणणार का ? त्याला ‘तुम्ही’ ‘तू’ असेच म्हणावे लागते.’- योगिराज हजरत पीरशाह पटेलबाबा, जिल्हा सिंधुदुर्ग
२ आ. स्वयंभू
स्वयं ± भू म्हणजे स्वतः निर्माण होणारा, म्हणजे एका अर्थी निराकारातून साकारात येणारा.
२ इ. प्रभू
प्रभू म्हणजे प्र + भवः · प्रकर्षाने निर्माण होणारा, उत्पन्न होणारा. ‘आचार कसा असावा हे सांगतो तो धर्म. ‘आचारः प्रभवो धर्मः’ असे म्हणतात आणि ‘धर्मस्य प्रभु अच्युतः’ म्हणजे धर्माचा उत्पत्तीकर्ता अच्युत असे म्हटले आहे.’ (एकनाथी भागवत – अध्याय १४)
शाक्तसंप्रदायात यालाच ‘आदीशक्ती’ म्हणतात. हा स्त्रीकारक नाही, तर गुणवाचक शब्द आहे.
३. व्याख्या
परमेश्वराच्या ज्या अंशापासून विश्वाची निर्मिती होते, त्याला ‘ईश्वर’ असे म्हणतात.