प्रस्तुत लेखात ‘परमेश्वर’ शब्दाची व्युत्पत्ती आणि अर्थ तसेच विविध पंथांनुसार ईश्वर, परमेश्वर आणि माया यांची व्याख्या देण्यात आली आहे.
१. व्युत्पत्ती आणि अर्थ
परमेश्वर ·परमः + ईशः + वरः आणि ईशः· ईः + शः
अ.`ईः’ – ईक्षते म्हणजे पहातो, म्हणजे सर्व जाणून घेणारा, सर्वज्ञ आणि `शः’ – शमयते म्हणजे शांत, तृप्त करतो. म्हणूनच जो सर्वज्ञ आहे आणि शांती देतो तो म्हणजे ईश. `वरः’ म्हणजे श्रेष्ठ; म्हणून `ईशः’ + `वरः’· ईश्वरः, म्हणजे जो सर्वज्ञतेत आणि शांती देण्यात श्रेष्ठ आहे तो. `परमः’ म्हणजे सर्वश्रेष्ठ; म्हणून `परमः’ + `ईश्वरः’· परमेश्वरः, म्हणजे सर्वज्ञतेत आणि शांती देण्यात जो सर्वश्रेष्ठ आहे तो. म्हणूनच शांती देणार्या परमेश्वराचे आकर्षण मानवजातीला अनादी काळापासून आहे.
आ. ‘ईश्’ म्हणजे स्वामित्व करणे, नियंत्रणात ठेवणे, सत्ता चालविणे, नियमन करणे किंवा `अश्’ म्हणजे व्यापून रहाणे, या धातूपासून ईश्वर शब्द बनला आहे. `ईश्वर’ म्हणजे स्वामी, सत्ताधीश. ईश्वर हा शब्द सामान्यपणे जगन्नियंता, सृष्टीस्थिती- प्रलय यांचा कर्ता, सर्वव्यापक, सर्वान्तर्यामी आणि देवाधिदेव अशा अर्थांनी घेतला जातो. शिव, श्रीविष्णु, श्रीराम, श्रीकृष्ण हे शब्दही ईश्वरवाचकच मानले जातात; पण ईश्वर या अर्थासमवेतच ते एक सांप्रदायिक भावही प्रकट करतात. ईश्वर किंवा परमेश्वर हे शब्द मात्र संप्रदायनिरपेक्ष ‘परमप्रभू’ हाच अर्थ केवळ सूचित करतात. ईश्वर हा जगताचा उत्पादक, जगन्नियंता, सर्वान्तर्यामी, सृष्टीचा स्वामी; पण सृष्टीहून भिन्न,पूज्य, देवाधिदेव आणि पुरुष आहे.’
पंथ |
ईश्वर |
परमेश्वर |
माया |
शैवपंथिय | ध्यानस्थ शिव | निर्बीज समाधीस्थ शिव म्हणजे शिवाचे निर्गुणरूप | नृत्य करणारा किंवा पार्वतीसह सारीपाट खेळणारा शिव |
वैष्णवपंथिय | भक्तवत्सल श्रीविष्णु | शेषशायी, अनंतशयनी श्रीविष्णु म्हणजे श्रीविष्णूचे निर्गुणरूप | श्री लक्ष्मीसहित श्रीविष्णु |