मांसाहार

मांसाहारामुळे तमोगुणाची वृद्धी होते. या आहारामुळे मनुष्य ईश्वरापासून दूर जातो. मांसाहाराचे दुष्परिणाम, पशूहत्या यांविषयी या लेखात पाहू.

 

व्यक्तीने मांसाहार करण्याची कारणे

१. एखादी व्यक्ती तिला आवडतो म्हणून मांसाहार करते.

२. वाईट शक्तीही एखाद्याकडून स्वतःची वासना पूर्ण करून घेण्यासाठी व्यक्तीला मांसाहार / तमोगुणी पदार्थ खायला लावते. तमोगुण वाढल्याने व्यक्तीला त्रास देणे वाईट शक्तीला सोपे होते.

 

मांसाहारात गणले जाणार्‍या अन्नघटकाचे उदाहरण आणि त्यामागचे कारण

‘प्राणीजन्य गर्भरूपी धारणा चल सजिवांमध्ये समाविष्ट होत असल्याने अशा उत्पत्तीची क्षमता असलेले घटक मांसाहारात मोडतात. ज्यात गर्भधारणा करण्याची, तसेच दुसर्‍या सजिवाला उत्पन्न करण्याची क्षमता असते, असे प्राणीजन्य बीज मांसाहारात मोडते.

अंडे : अंड्यातून सजीवाची निर्मिती होत असल्याने त्यात प्राणीजन्य गर्भरूपी बीज दडलेले असल्याने ते शाकाहारी अन्न होऊ शकत नाही.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, फाल्गुन शुद्ध १२, कलियुग वर्ष ५११० ८.३.२००९, दुपारी ४.११)

 

मांसाहाराचे दुष्परिणाम

१. ‘मांसाहार हे अस्वाभाविक अन्न आहे. त्या अन्नामुळे पचनशक्तीला प्रतिबंध होतो.

२. मांसाहारामुळे रुधिराभिसरण आणि श्वासोच्छ्वास यांत अडथळे येतात. मांसाहारी लोकांना हृदयरोग, छाती आणि पोट यांचा कर्करोग किंवा अन्य रोग होतात.

३. मांसाहारात प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रोग होतात.’

४. ‘मांसाहारामुळे तमोगुणाची वृद्धी होते. त्यामुळे मनुष्य तामसिक बनतो.

५. या आहारामुळे मनुष्य ईश्वरापासून दूर जातो.

६. सर्वसाधारणतः नियमित मांसाहार करणारे साधनेकडे वळत नाहीत आणि वळल्यास साधनेत टिकणे कठिण असते.

७. मांसाहारामुळे कामवासनेचे विकार तीव्र होतात.

– ईश्वर (श्री. मोहन चतुर्भुज यांच्या माध्यमातून, २५.५.२००७, दुपारी ४.३०)

 

मांसाहाराचा परिणाम विषसेवनाप्रमाणे होणे

अ. ‘वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टीने आहाराकरता एखाद्या प्राण्याची हत्या केली जाते, त्या वेळी मृत्यूभयाने त्या प्राण्याच्या शरिरात अ‍ॅड्रीनल आणि नॉरअ‍ॅड्रीनल हे विषारी रस निर्माण होतात.

आ. पशु-पक्ष्यांत ट्रिचिनॉसिस या रोगाचे (आजाराचे) ट्रिचिनेला नामक कृमी असतात. मांस खाल्ले की, हे कृमी माणसाच्या आतड्यात मोठ्या प्रमाणावर अंडी घालतात. अंड्यांतून निघालेले कृमी रक्तप्रवाहात वहात जातात आणि शरिरातील स्नायूंच्या तंतूत रुतून बसतात. त्यांचे पुढे रेणूत (cyst) रूपांतर होते. अन्नातून विष पोटात गेले की, जसे घडते, तसेच नेमके इथेही घडते.’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

 

मांसाहारासाठी प्रतिदिन एक कोटी पशूंचा वध होणे

‘स्वामी अग्निवेश म्हणाले, ‘‘जगातील सर्वांत मोठी समस्या कुपोषण आहेृ. जगात प्रतिदिन एक कोटी पशूंचा वध केला जातो आणि एकेका पशूसाठी १० किलो धान्याची व्यवस्था केली जाते. जगात होणार्‍या युद्धांचे कारणही मांसाहारच आहे.’

 

वृक्ष तोडण्यापेक्षाही पशूहत्या अधिक क्रूर !

‘डॉलर्सकरता आम्ही हवं ते पाप करायला विलक्षण तत्पर आहोत. निसर्गाचा उच्छेद करतो आहोत. निसर्गाशी स्पर्धा करतो आहोत. अन्य जीव, पशू-पक्षी यांची निर्घृण हत्या करतो आहोत. वनांची सरसकट तोड करतो आहोत. झाडे का तोडता ? कशाकरता ? (Hundreds of millions of trees are cut – down just to print rubbish novels and pornographic literature.) स्वार्थाकरता, जीवन पापमय बनवणारे लैंगिक साहित्य प्रकाशित करण्याकरता, वृक्षांचा उच्छेद ? वृक्षांना जीव नाही का ? वृक्षांना जीवनाचा, जगण्याचा अधिकार नाही का ? झाडे तोडण्याचा अधिकार मानवाला कोणी दिला ? झाडे तोडून, कागदाचे कारखाने काढून, भूमी अन् पाणी प्रदूषित करण्याचा आम्हाला काय अधिकार ? स्वार्थाकरता, अधिक डॉलर्स कमावण्याकरता मानव निसर्गाची पिळवणूक करतो आहे ! जिव्हालौल्याकरता प्रतिवर्षी आम्ही अब्जावधी पशूंची हत्या करतोच आहोत. पक्षी मारतो आहोत. वृक्ष तोडण्यापेक्षाही पशूहत्या अधिक क्रूर. पशूंची दुःखसंवेदना विलक्षण तीव्र आहे. पशूंना जगण्याचा, जीवनाचा अधिकार नाही का ? जिव्हालौल्याकरता त्यांना मारण्याचा मानवाला काय अधिकार ?

 

पृथ्वी, सागर आणि आकाश यांच्या तळापर्यंतचे भूचर, जलचर
आणि आकाशचर जीव यांची शांती भग्न कराल, तर प्रकृती तुम्हाला अशांत बनवील !

प्रथिने (प्रोटीन्स) हवीत ना ! दूध, लोणी, ताक, मलई आणि तूप यांत भरपूर प्रथिने आहेत. धान्यात भरपूर जीवनसत्त्वे आहेत. मग पशुंना का मारता ? पृथ्वी, सागर आणि आकाश यांच्या तळापर्यंतचे भूचर, जलचर, आणि आकाशचर जीव यांची शांती भग्न कराल, तर प्रकृती तुम्हाला अशांत बनवील.’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सात्त्विक आहाराचे महत्त्व’

Leave a Comment