
बडोदा (गुजरात) – परिपूर्ण सेवा करणे, प्रीती आदी विविध गुणांचा समुच्चय असणारे, तसेच ईश्वराच्या सतत अनुसंधानात असणारे बडोदा येथील सनातनचे साधक श्री. श्रीपाद हर्षे (वय ८९ वर्षे) हे सनातनच्या १२७ व्या संतपदी विराजमान झाले. ११ ऑक्टोबर या दिवशी बडोदा येथील सनातनच्या साधिका सौ. अंशू संत यांच्या निवासस्थानी चैतन्यमय वातावरणात पू. हर्षेआजोबा आणि सौ. शीला हर्षेआजी यांच्याशी अनौपचारिक संवाद साधतांना सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी पू. हर्षेआजोबा यांच्या संतपदाचे गुपित उलगडले. सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी त्यांचा सन्मान केला. या वेळी सनातनच्या संत पू. (सौ.) संगीता जाधव यांची वंदनीय उपस्थिती लाभली. या वेळी पू. हर्षेआजोबा यांचे कुटुंबीय उपस्थित होते. ही आनंदवार्ता ऐकल्यानंतर उपस्थित सर्व कुटुंबियांना पुष्कळ आनंद झाला.