‘वर्ष २०२० आणि २०२१ मध्ये सर्व जगाला वेठीस धरणार्या ‘कोरोना’ महामारीतून सर्व जण डोके वर काढत नाहीत, तोच २७.९.२०२३ या दिवशी आणखी एक त्याहून भयानक महामारी येणार असल्याची बातमी वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली. त्यात ‘जागतिक आरोग्य संघटने’ने दावा केला आहे की, जगभरात ‘कोरोना’ महामारीपेक्षाही ७ पटींनी अधिक घातक अशी ‘डिसीझ एक्स’ नावाची महामारी येणार आहे. त्यामुळे जगातील ५ कोटी लोकांचा जीव जाऊ शकतो. ही महामारी जगावर केव्हाही घाला घालू शकते. या महामारीविषयीची माहिती, म्हणजे ती कशी पसरणार आहे, तिची लक्षणे इत्यादी सूत्रे मात्र अजून प्रसिद्ध करण्यात आलेली नाहीत. कधीही येऊ शकणार्या या महामारीविषयी सर्वांनी सतर्क रहाणे आणि तिच्यावर वैद्यकीय उपचारांसह आध्यात्मिक उपाययोजना आखणे आवश्यक आहे.
१. ‘डिसीझ एक्स’ या महामारीविषयी सूक्ष्मातून जाणवलेली सूत्रे
अ. या रोगाचा विषाणू हवेतून पसरणारा आहे आणि तो श्वासावाटे शरिरात प्रवेश करील.
आ. श्वासावाटे शरिरात गेल्यावर तो विषाणू हृदयावर परिणाम करील. त्यामुळे हृदयाचे कार्य मंदावेल आणि त्याच्या रक्ताभिसरणाच्या कार्यात अडथळा निर्माण होईल.
इ. त्यानंतर मेंदूला रक्तपुरवठा अल्प झाल्याने मेंदूवर परिणाम होईल. हा परिणाम अधिकतर मेंदूच्या उजव्या भागावर होईल. (मेंदूचा उजवा भाग भावना, जाणिवा, विविध कला, आजूबाजूच्या गोष्टींचे ज्ञान होणे इत्यादींशी संबंधित कार्य सांभाळतो.)
ई. या रोगामुळे हृदय आणि मेंदू या शरिराच्या दोन मुख्य इंद्रियांवर परिणाम होणार असल्याने संपूर्ण शरिरावर परिणाम होण्याचे प्रमाण पुष्कळ असणार आहे. त्यामुळे मनुष्य हतबल होऊन त्याची स्थिती ७ – ८ घंट्यांत गंभीर होऊ शकते आणि तो मृत्यूमुखी पडू शकतो.
उ. ‘कोरोना’ महामारीच्या वेळी लागण झालेल्या व्यक्तीस सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसून येत होती; पण ‘डिसीझ एक्स’ या रोगाची बाह्य लक्षणे फारशी दिसून येणार नाहीत.
२. ‘डिसीझ एक्स’ या महामारीवर मात करण्यासाठी करावयाचा जप
‘श्री दुर्गादेव्यै नमः । श्री दुर्गादेव्यै नमः । श्रीराम जय राम जय जय राम । श्री हनुमते नमः । ॐ नमः शिवाय ।’
हे पाचही नामजप दिलेल्या क्रमाने सलग म्हटले की, तो एक जप होईल. अशा प्रकारे हा ५ नामजपांचा एकत्रित नामजप ‘डिसीझ एक्स’ या रोगावर मात करण्यासाठी ४ ते ५ घंटे करावा लागेल.
हा नामजप करतांना मधे मधे कापराचा वास घेतल्यास चांगला लाभ होईल.
३. कृतज्ञता
‘डिसीझ एक्स’ या रोगाविषयी सूक्ष्मातील माहिती आणि त्यावर करावयाचा नामजप गुरुकृपेनेच मिळाला. यासाठी मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. ‘डिसीझ एक्स’ महामारीच्या काळात या नामजपाचा सर्वांना लाभ होऊ दे’, अशी श्री गुरुचरणी प्रार्थना करतो.’
Dear Sir,
Thanks for the valuable message shared by this group.. This was so helpful for me and the society.. Thanks..