नवे-पारगाव (जिल्हा कोल्हापूर) – ‘येणार्या आपत्काळात आधुनिक वैद्य आणि औषधे उपलब्ध होतीलच असे नाही’, असे विविध द्रष्ट्या संतांनी सांगितले आहे. अशा आपत्काळात रुग्णाच्या वेदना आणि आजार न्यून करण्यासाठी बिंदूदाबन शिकून घेणे आवश्यक आहे, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने नवे पारगाव येथे ३ दिवसांचे निवासी ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ घेण्यात आले. याचा लाभ अनेक साधक शिबिरार्थी आणि रुग्ण यांनी घेतला. या शिबिराला सनातनच्या संत पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे यांची वंदनीय उपस्थिती सर्व दिवस लाभली. या वेळी सनातनचे साधक आणि निसर्गोपचार तज्ञ डॉ. दीपक जोशी यांनी शिबिरार्थींना चेहरा, डोके, कान आणि पाठ यांवरील बिंदूदाबनाच्या पद्धती, शरिरातील वात काढण्याची प्रक्रिया शिकवली. पाठीच्या मणक्याचे आणि गुडघ्याचे आजार असणार्या रुग्णांची पडताळणी करण्यात आली. काही औषधे घरीच कशी सिद्ध करावी ? याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
Home > कार्य > समाजसाहाय्य > सनातन संस्थेच्या वतीने नवे-पारगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ पार पडले !
सनातन संस्थेच्या वतीने नवे-पारगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ पार पडले !
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
- धरुहेडा (हरियाणा) येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘नैतिक मूल्यांचे संवर्धन’ या विषयावर मार्गदर्शन
- सनातन संस्थेच्या वतीने मथुरा (उत्तरप्रदेश) येथील ‘राधा माधव इंटर कॉलेज’मध्ये ‘तणाव निर्मूलन’ विषयावर व्याख्यान पार...
- नामस्मरणाने विद्यार्थ्यांचा तणाव न्यून होऊन त्यांची कार्यक्षमता वाढते !- सौ. प्राची जुवेकर, सनातन संस्था
- वाराणसीमध्ये (उत्तरप्रदेश) विविध ठिकाणी ‘तणावमुक्ती नियंत्रण’ विषयावरील प्रवचनांना शिक्षकांचा चांगला प्रतिसाद
- बिहारमधील मुझफ्फरपूर, गया, समस्तीपूर, सोनपूर येथील विविध ठिकाणी ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’ या विषयावर मार्गदर्शन
- तणावमुक्तीसाठी अध्यात्माला पर्याय नाही ! – सौ. भार्गवी क्षीरसागर, सनातन संस्था