सनातन संस्‍थेच्‍या वतीने वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे ४ ठिकाणी ‘जीवनातील साधनेचे महत्त्व’ या विषयावर प्रवचनांचे आयोजन

वाराणसी (उत्तरप्रदेश) – प्रत्‍येक मनुष्‍याला आंतरिक सुख आणि शांती हवी असते. ही सुख-शांती मिळवण्‍यासाठी तो सकाळपासून रात्रीपर्यंत सतत कार्यरत असतो. कधीही न संपणार्‍या सुखाला ‘आनंद’, असे म्‍हणतात. आनंद मिळवण्‍यासाठी आध्‍यात्मिक साधना करणे आवश्‍यक आहे. सध्‍याच्‍या कलियुगात नामजप ही सर्वोत्तम साधना आहे. पूर्वजांच्‍या त्रासांपासून मुक्‍ती मिळवण्‍यासाठी आणि आध्‍यात्‍मिक प्रगतीसाठी आपण कुलदेवता अन् ‘श्री गुरुदेव दत्त’ यांचा नामजप केला पाहिजे. नामस्‍मरणाला कोणतेही बंधन नाही. नामजपामुळे अनेक जण आनंदी जीवन जगत आहेत, असे मार्गदर्शन सनातन संस्‍थेच्‍या वतीने आयोजित केलेल्‍या प्रवचनांमध्‍ये करण्‍यात आले. ‘जीवनातील साधनेचे महत्त्व’ या विषयावर वाराणसीतील तरणा चमाव, हुकुलगंज, पिशाचमोचन आणि जैतपुरा या ठिकाणी प्रवचने आयोजित करण्‍यात आली होती.

Leave a Comment