अनुक्रमणिका
आपल्याला केवळ गुरु आणि संत हेच शब्द माहीत असतात. गुरूंच्या आध्यात्मिक स्तरानुसार गुरु, सद्गुरु आणि परात्परगुरु असे गुरूंचे तीन प्रकार आहेत. प्रस्तुत लेखात आपण त्या प्रत्येक प्रकारच्या गुरूंची व्याख्या आणि अर्थ, आध्यात्मिक पातळी (टक्के), त्यांच्यामुळे स्वतःला अन् इतरांना येणार्या अनुभूती, त्यांची स्वत:ची साधना, त्यांच्या बोलण्यातील विषय, ते शिष्यांकडून साधना कशी करवून घेतात, त्यांची शिकवण्याची पद्धत, त्यांचे कार्य, शब्द आणि शब्दातीत शिकवणे, त्यांच्यातील त्रिगुणांचे प्रमाण यांबरोबरच त्यांच्यात असलेले विविध आध्यात्मिक गुणांचे प्रमाण (उदा. भाव, अव्यक्त भाव, तळमळ, नेतृत्व, प्रीती अन् अहं) यांविषयीची तुलनात्मक माहिती सारणींच्या माध्यमातून पाहू. या माहितीवरून गुरूंच्या आध्यात्मिक कार्याची व्याप्ती आणि महत्त्व यांची जाणीव होऊन हिंदु धर्माची महानताही लक्षात येईल.
१. व्याख्या, अर्थ, कार्य आणि शिष्याच्या उन्नतीतील वाटा
गुरु | सद्गुरु | परात्परगुरु | |
---|---|---|---|
१. व्याख्या अन् अर्थ | अ. मायेचे ज्ञान अन् गुरूंतील तत्त्व यांची जाणीव करून देणारे | आत्मानुभूती देणारे अन् ‘सर्वत्र ब्रह्म आहे’, याची जाणीव करून देणारे | अद्वैताची अनभूती देणारे |
आ. ज्ञानगुरु | दीक्षागुरु | मुक्तीगुरु | |
इ. देहधारी | नाम | अद्वैत | |
२. आध्यात्मिक पातळी (टक्के)
(सर्वसाधारण व्यक्ती २० टक्के ) |
७० | ८० | ९० हून जास्त |
३. स्वतःला अन् इतरांना येणारी अनूभूती | शक्ती | आनंद | शांती (टीप १) |
४. स्वतःची साधना | असणे | असणे | आवश्यकता नसणे |
५. मोक्षप्राप्ती | शक्य | सहज शक्य | झालेलीच असते. |
६. कुंडलिनीचे स्थान | |||
अ. दैनंदिन जीवनात | अनाहतचक्र | विशुद्धचक्र | सहस्रारचक्र |
आ. साधनेच्या वेळी | आज्ञाचक्र | सहस्रारचक्र | – (साधना करत नाहीत.) |
७. इतरांच्या मार्गदर्शनासाठी संप्रदायाच्या नियमानुसार वागणे | असते | असते | – (संप्रदायांच्या पलीकडे गेलेले) |
८. वाईट शक्ती घालवणे | |||
अ. मोठ्या वाईट शक्ती, उदा. मोठी भूतबाधा, करणी इत्यादींचा परिहार | शक्य; परंतु कठीण | शक्य | सहज शक्य |
आ. मोठ्या वाईट शक्ती घालवण्यासाठी वापरावयाची पद्धत | कृती हेतूपूर्वक करावी लागते. | संकल्प | संकल्पाचीही आवश्यकता नाही. यांच्या सहवासात आल्यावर वाईट शक्ती आपोआप जाते. |
९. बोलण्यातील विषय | अध्यात्म | अध्यात्म | कोणताही |
१०. चमत्काराची पद्धत | देवाची किंवा गुरूंची प्रार्थना | संकल्प | ऋद्धी-सिद्धी अन् देवता सेवा म्हणून यांच्यासाठी स्वतःहून चमत्कार घडवून आणतात. |
११. कार्य | अ. शिष्याचा साधनाकुंभ सिद्ध करणे | शिष्याच्या साधनाकुंभात साधनाबीज पेरणे | शिष्याला अद्वैताकडे नेणे |
आ. शिष्याला सगुणातील (गुरूंतील) चैतन्याची अनुभूती करून देणे | शिष्याला निर्गुणतत्त्वाची अनुभूती देणे | शिष्याला ‘सगुण अन् निर्गुण एकच आहेत’, याची अनुभूती देणे | |
१२. किती टक्के आध्यात्मिक पातळीच्या शिष्याला प्राप्ती होते ? | ५५ | ७० | ८० |
१३. शिष्याची साधना | शिष्याला साधना करायला शब्दांत सांगतात. | शिष्याकडून त्याच्या नकळत संकल्पाने साधना करवून घेतात. | शिष्याची साधना यांच्या अस्तित्वाने आपोआप होते. |
१४. शिकवणे (टक्के) | |||
अ. शब्दांद्वारे | ७० | ४० | २ |
आ. शब्दांतीतपणे | ३० | ६० | ९८ |
१५. शिष्याची होणारी अधिकतम (कमाल) उन्नती (टक्के) | ७० | ८० | १०० |
१६. शिष्याच्या उन्नतीतील वाटा (टक्के) | ३० | ४० | ५० |
२. विविध घटकांचे सर्वसाधारण तुलनात्मक प्रमाण
प्रमाण (टक्के) | |||
---|---|---|---|
गुरु | सद्गुरु | परात्परगुरु | |
१. अव्यक्त भाव | ७० | ८० | ९० |
२. तळमळ | ७० | ८० | ९० |
३. नेतृत्व | ५० | ७० | ९० |
४. प्रीती | ३० | ५० | ८० |
५. अहं | १० | ८ | ५ |
टीप १ – शक्तीच्या स्पंदनांपेक्षा आनंदाची स्पंदने १० लक्षपटींनी सूक्ष्म आहेत आणि आनंदाच्या स्पंदनांपेक्षा शांतीची अनुभूती अनंतपटींनी सूक्ष्मतम आहे; म्हणून सूक्ष्मातील कळायला लागल्यावर साधकाला प्रथम शक्तीच्या, पुढे आनंदाच्या आणि सर्वांत शेवटी शांतीच्या पातळीच्या गुरूंची ओळख पटते. (मूळस्थानी)
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘गुरूंचे महत्त्व, प्रकार आणि गुरुमंत्र’
३. संतांचे प्रकार, त्यांची पातळी, एकूण संतांपैकी प्रमाण आणि कार्याचा उद्देश
संतांचे प्रकार | पातळी (टक्के) | प्रमाण (टक्के) | कार्याचा उद्देश |
---|---|---|---|
१. भोंदू संत | ५० | ५० | स्वार्थ साधणे |
२. संत नसलेले; पण आहेत असे समजले जाणारे | ५० ते ६० | ४५ | इतरांचे व्यावहारिकदृष्ट्या भले करणे |
३. खरेे संत | ७० टक्क्यांहून अधिक | ५ | इतरांचे आध्यात्मिकदृष्ट्या भले करणे |
एकूण | १०० |
४. खर्या संतांचे प्रकार, त्यांची पातळी, खर्या संतांपैकी प्रमाण आणि कार्याची पद्धत
यांच्या कार्याचा उद्देश एकच असतो आणि तो म्हणजे इतरांचे आध्यात्मिकदृष्ट्या भले व्हावे.
संतांची पातळी (टक्के) | प्रमाण (टक्के) | कार्याची पद्धत |
---|---|---|
७० | ६८ | इतरांना साधना सांगणे |
८० | २० | इतरांसाठी साधना करणे |
९० | १० | इतरांच्या भल्यासाठीचा संकल्प |
१०० | २ | अस्तित्व |
– डॉ. आठवले (१८.६.२०१४)
५. खर्या गुरूंची लक्षणे
(परात्पर गुरु) कै. परशराम पांडे महाराज
‘जो सत्कुलात जन्माला आला आहे, सदाचारी आहे, शुद्ध भावना असलेला आहे, इंद्रिये ज्याच्या ताब्यात आहेत, जो सर्व शास्त्रांचे सार जाणणारा आहे, परोपकारी आहे, भगवंताशी नेहमी अनुसंधानित आहे, ज्याची वाणी चैतन्यमय आहे, ज्याच्यात तेज आणि आकर्षणशक्ती आहे, जो शांत असतो; वेद, वेदार्थाचा पारदर्शी आहे; योगमार्गात ज्याची प्रगती आहे; ज्याचे हृदय ईश्वराप्रमाणे आहे (त्याचे कार्य ईश्वरेच्छेने होते), अशा प्रकारचे गुण ज्याच्यामध्ये आहेत, तोच शास्त्रसंमत गुरु होण्यासाठी योग्य आहे. असे गुरुच दीक्षित शिष्याचेच नव्हे, तर सर्व जगाचे हित साधू शकतात.’
Very nice article, its a grace on seekers who are guided by Paratpar Guru H.H. Dr. Athavale