रामनाथी, ४ जुलै (वार्ता.) – महर्षींच्या आज्ञेने हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना चांगले आरोग्य लाभावे आणि साधकांना होणारे आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत, या उद्देशांसाठी येथील सनातनच्या आश्रमात गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला म्हणजे २ जुलै या दिवशी नृसिंह याग करण्यात आला. या वेळी मोगरा, गुलाब, कण्हेर, शेवंती आणि चाफा या पुष्पांची यज्ञात आहुती देण्यात आली. यागाच्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची वंदनीय उपस्थिती होती. ब्रह्मोत्सवाच्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी धारण केलेल्या विष्णुरूपाची प्रतिमा यज्ञस्थळी पूजेत ठेवण्यात आली होती. या प्रतिमेला यागाच्या आरंभी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी मोगर्याचा पुष्पहार अर्पण केला. ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. चेतन राजहंस, ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. भानू पुराणिक, श्री. शशांक जोशी, श्री. नीलेश चितळे आणि ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. विनायक आगवेकर यांनी यज्ञात पुष्पांची आहुती दिली. सनातन पुरोहित पाठशाळेचे श्री. सिद्धेश करंदीकर, श्री. ईशान जोशी आणि श्री. अमर जोशी यांनी यागाचे पौरोहित्य केले.
रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात नृसिंह याग पार पडला !
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
- ‘मकरसंक्रांतीच्या निमित्ताने सनातनचे ग्रंथ, तसेच उत्पादने वाण म्हणून देणे’, ही चिरंतन आणि सर्वाेत्तम भेट असल्याने...
- सनातनच्या आश्रमांतील ‘संगणकांची देखभाल आणि दुरुस्ती’ या सेवांसाठी साधक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांच्या सहयोगाची आवश्यकता...
- विश्व हिंदु परिषदेचे कोकण प्रांत मंत्री श्री. मोहन सालेकर यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला...
- सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित धर्मश्री प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा अमृत महोत्सवी सन्मान...
- गोव्यात ३० नोव्हेंबरला सनातन संस्थेचा रौप्य महोत्सवी सोहळा !
- पैशांची देवाण-घेवाण, आर्थिक किंवा भूमीचे व्यवहार करणे, तसेच विवाह जुळवणे आदी वैयक्तिक गोष्टी आपल्या जबाबदारीवर...