रामनाथी (गोवा) – ३ जुलै २०२३ या दिवशी म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी सनातनच्या ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन’ या मराठी आणि हिंदी भाषेतील ‘इ-बुक’चे लोकार्पण सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या इ-बुकमध्ये ‘अध्यात्मशास्त्रातील मूलभूत तत्त्वांनुसार आणि शीघ्र गुरुकृपा संपादन करता येईल अशी सोपी अन् योग्य साधना कोणती करावी ?’, याचे प्रायोगिक मार्गदर्शन केले आहे. हे इ-बुक ‘अॅमेझॉन किंडल’वर उपलब्ध आहे.
‘अॅमेझॉन किंडल’वरील मराठी ग्रंथाची लिंक : https://amzn.eu/d/j5ae10B
‘सनातन शॉप’वरील मराठी ग्रंथाची लिंक : https://sanatanshop.com/shop/ebooks/marathi/