रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेचा आश्रम पहातांना धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय !

गोवा येथील सनातनचा रामनाथी आश्रम

१. श्री. अविनाशकुमार बादल, प्रदेश अध्यक्ष, हिन्दू पुत्र संघटन, बिहार

‘आश्रमात शांतीसह समन्वय आणि प्रत्येक मानवाप्रती समभाव मी यापूर्वी इतरत्र कुठेच पाहिले नाही.’

२. मेजर सरस त्रिपाठी, लेखक आणि प्रकाशक, प्रज्ञा मठ पब्लिकेशन, गाझियाबाद, उत्तरप्रदेश

‘आश्रम पुष्कळ चांगला आहे. आश्रम स्वच्छता आणि आध्यात्मिक ऊर्जेने भरपूर भरलेला आहे. मला येथे पुष्कळ काही शिकायला मिळाले आणि समजले. हा आश्रम व्यक्तीचे संपूर्ण जीवन पालटू शकतो.’

३. अधिवक्ता हितेश मिश्रा, अलाहाबाद उच्च न्यायालय, गाझियाबाद, उत्तरप्रदेश

‘आश्रम पाहून फारच सुंदर आणि सकारात्मक भाव मनात उत्पन्न झाला. आश्रमातील साधकांचे वागणे अतिशय भावपूर्ण आहे.’

४. श्री. पी.पी.एम्. नायर, आचार्य, केरलीय क्षेत्र परिपालन समिती, मुंबई, महाराष्ट्र

‘त्याग आणि शिस्त यांच्या प्रभावाने आम्हाला पुष्कळ प्रेरित केले. मला येथे पुनःपुन्हा येण्याची इच्छा आहे.’

५. डॉ. अजयकुमार जयस्वाल, जैतपुरा

‘आश्रमातील प्रत्येक क्षण हे ईश्वरप्राप्तीचे माध्यम आहे.’

(१५.६.२०२३)

६. डॉ. अजय कुमार जयस्वाल, जैतपुरा

‘आश्रमातील प्रत्येक क्षण हे ईश्‍वरप्राप्तीचे माध्यम आहे.’

७. श्री. जय प्रकाश सिंह, जिल्हा वाराणसी, उत्तरप्रदेश

‘आश्रम पाहून मला अद्भुत शांती अनुभवता आली. आश्रमात पुष्कळ साधक आहेत; परंतु आश्रमातील वातावरण अतिशय शांत आहे. येथे आल्यावर माझे मन स्थिर आणि प्रसन्न झालेे.’

८. श्री. सुमित सेन (धर्मरक्षक), भोपाळ, मध्यप्रदेश

‘आश्रमातून ईश्‍वरी शक्ती प्रक्षेपित झाली’, असे मला अनुभवता आले.’

९. श्री. श्रवण कुमार, शिवपूर, वाराणसी

‘आश्रमात सगळीकडे स्वच्छता आहे. आश्रमातील वस्तूंची रचना सात्त्विक पद्धतीने केली आहे. आश्रमातील वातावरण आध्यात्मिक आहे.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : १६.६.२०२३)

१०. श्री. अनिल धीर (संयोजक, इंडियन नॅशनल ट्रस्‍ट फॉर आर्ट अँड कल्‍चरल हेरिटेज), भुवनेश्‍वर, ओडिशा.

अ. ‘आश्रमातील शांती अनुभवण्‍यासारखी असून ती शब्‍दांत सांगता येत नाही.

आ. येथे आलेल्‍या प्रत्‍येक वेळी मी अधिकाधिक अंतर्मुख होतो. येथून परत गेल्‍यानंतरही माझी ही अवस्‍था काही आठवडे नव्‍हे, तर काही मासांपर्यंत टिकून असते. मला आश्रमात पुनःपुन्‍हा येण्‍याची ओढ लागलेली असते.

इ. आश्रमातील ध्‍यानमंदिरात काही वेळ बसल्‍यानंतर ताजेतवाने आणि उत्‍साहवर्धक वाटते.’

११. श्री. श्रीकांत मोदी (व्‍यवस्‍थापकीय संचालक, पी.एस्.एस्.,एन्.), बीदर, कर्नाटक.

अ. ‘मला आश्रमातील सात्त्विकता पहाता आणि अनुभवता आली.’

१२. श्री. पळ संतोष कुमार (संस्‍थापक अध्‍यक्ष, हिंदू येलुच्‍ची पेरवाई (हिंदु युवा जागृत मंच)), तंजावुर, तमिळनाडू.

अ. ‘आश्रमातील प्रत्‍येक साधक दायित्‍वाने सेवा करतो.

आ. आश्रमात पुष्‍कळ चैतन्‍य आहे.

इ. असा आश्रम मी कुठेही पाहिला नव्‍हता. ‘गुरुकृपेमुळे मला आश्रम पहाण्‍याची सुवर्णसंधी मिळाली’, असे मला वाटते.’

१३. पू. स्‍वामी चित्तरंजन महाराज (श्री श्री शांती काली आश्रम), त्रिपुरा

अ. ‘आश्रम पहातांना मला पुष्‍कळ चांगले वाटले. जीवन जगण्‍यासाठी मला एक नवीन प्रेरणा मिळाली.

आ. त्रिपुरा येथे परत गेल्‍यावर ‘हिंदु राष्‍ट्र-स्‍थापना’ करण्‍याच्‍या दिशेने काम करण्‍याची इच्‍छा माझ्‍या मनात जागृत झाली.’

१४. सुश्री कनिष्‍का मोहन तिवारी, जळगाव

‘आश्रमातील भगवान श्रीकृष्‍णाचे चित्र पाहून माझे मन शांत झाले आणि श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीचे चित्र पाहिल्‍यावर मला मातेच्‍या चेहर्‍यावर हास्‍य दिसले.’

१५. श्री. प्रसन्‍ना शेट्टी (शिक्षक, पतंजलि योग शिक्षण), दक्षिण कन्‍नड, कर्नाटक.

अ. ‘मला आश्रम पहातांना पुष्‍कळ चांगले वाटले. येथील माहिती दिल्‍याबद्दल धन्‍यवाद !’

१६. डॉ. निशांत दास (सचिव, तरुण हिंदू), धनबाद, झारखंड.

अ. ‘या स्‍थानाची स्‍वतःची प्रभावळ (ऑरा) आहे. येथील भक्‍ती आणि अध्‍यात्‍म (साधना) यांमुळे आश्रमात सर्वत्र सकारात्‍मक स्‍पंदने आहेत.’

१७. श्री. रंजन आर्. सुवर्णा (विभाग प्रमुख, युवा भारत), उडुपी, कर्नाटक.

अ. ‘देवता आणि संत यांच्‍या कृपाशीर्वादाने येथील साधक प्रत्‍येक कृती उत्‍कृष्‍टरित्‍या करतात. ‘रामनाथी आश्रमात हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना झाली आहे’, असे मला जाणवले.’

१८. श्री. मानस सिंग रॉय (सदस्‍य, भारतीय साधक समाज), हावडा, बंगाल.

अ. ‘पूर्वीच्‍या तुलनेत आश्रमातील सकारात्‍मक स्‍पंदनांमध्‍ये वाढ झाली आहे’, असे मला जाणवले.

आ. ‘हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना होणारच आहे’, याबद्दलची सकारात्‍मक भावना माझ्‍या मनात जागृत झाली.’

१९. अधिवक्‍ता दत्तात्रय सणस (प्रमुख कार्यवाह, हिंदू महासभा, महाराष्‍ट्र कार्यकारिणी), सातारा

अ. ‘रामनाथी आश्रमातील मांडणी अप्रतिम आहे.

आ. येथे सनातन धर्माचे दर्शन घडते.

इ. हिंदु राष्‍ट्र-स्‍थापनेच्‍या कार्यात मी तुमच्‍या समवेत आहे.

ई. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य अवर्णनीय आहे. आश्रमातील सेवा करणार्‍यांचे कार्य पाहून त्‍यांच्‍या कार्यास कोटी कोटी नमस्‍कार !’

२०. श्री. राजेंद्र शंकर शिंदे (शहर प्रमुख, महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना), महाबळेश्‍वर, सातारा.

अ. ‘रामनाथी आश्रम पाहून माझ्‍या मनाला शांती वाटली, तसेच माझे मन प्रसन्‍न झाले. येथे मला साक्षात् संतांचे दर्शन झाले.’

२१. सौ. वृंदा अजय मुक्‍तेवार (महिला शहर प्रमुख, शिवसेना), अमरावती

अ. ‘आश्रमात पोचताच माझ्‍यात नवचैतन्‍य निर्माण झाले.

आ. आश्रम पाहून माझ्‍यात सकारात्‍मक ऊर्जा निर्माण झाली.

इ. माझ्‍या मनातील उत्‍साह द्विगुणीत झाला, तसेच माझे मन प्रसन्‍न होऊन माझी आध्‍यात्मिक ओढ वाढीस लागली.’

२२. श्री. विनीत दि. पाखोडे (अध्‍यक्ष, श्री पिंगळादेवी संस्‍थान, नेर पिंगळाई), अमरावती.

अ. ‘हिंदु सनातन धर्म हा संपूर्ण विश्‍वाला सुख, शांती आणि समृद्धी देणारा आहे’, हे आश्रमात आल्‍यावर मी प्रत्‍यक्ष अनुभवले.

आ. हा आश्रम पुष्‍कळ चैतन्‍यमय आहे.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : १६.६.२०२३)

२३. श्री. अविनाश मसूती, जिल्हा धारवाड

‘मी मागील ३ वर्षांपासून आश्रमात येत आहे. आश्रमाच्या परिसरातील मंदिरांचे चैतन्य वाढले आहे. श्रीरामशिळा पाहून मला पुष्कळ आनंद झाला. ‘मागील वर्षापेक्षा आश्रमाचे चैतन्य वाढले आहे’, असे जाणवले.’

२४. अधिवक्ता मल्लेशाप्पा न. बाडगी, लक्ष्मेश्वर

‘मी मागील ४ वर्षांपासून आश्रमात येत आहे. येथे आल्यावर ‘मला स्वर्गलोकात आलो आहे’, असे वाटत आहे. इथून घरी गेल्यानंतर काम करतांना मला चैतन्य अनुभवता येते.’

२५. श्री. शिवय्या शास्त्री (कार्याध्यक्ष, जयकर्नाटक जनपरा वेदिके ) शिवमोग्गा, कर्नाटक

‘हा आश्रम माझ्या जीवनातील आध्यात्मिक वातावरण असलेले आणि विशेष असे स्थळ आहे. हिंदु राष्ट्रासाठी रात्रंदिवस कष्ट करणारे आमचे सर्व साधक आणि हिंदु कार्यकर्ते यांचा विजय होऊ दे. आश्रमाचे नीती-नियम आदर्श आहेत.’

२६. श्री. शिवप्रसाद, चंदापुरा, बेंगळुरू, कर्नाटक

‘आश्रम हे ऋषीमुनींचे निवासस्थान आहे’, असे वाटते. येथील साधक सर्वांना ज्ञानदान करत आहेत. या आश्रमात आणखी अधिक संशोधने करून सर्वांना आपल्या सनातन शक्तीचा उपयोग होऊ दे. या ठिकाणी ध्यानाचे पिरॅमिड निर्माण केले, तर ते उपयुक्त होईल.’

२७. श्री. शिवकुमार, कर्नाटक

‘देवतांची चित्रे बनवली आहेत. तिथे देवाची शक्ती आहे’, असे वाटले.’

२८. कर्नल आर्.एस्.एन्. सिंह (रक्षण विशेषज्ञ), नवी देहली

अ. ‘आश्रम पाहून अत्‍यंत सुखद वाटले.

आ. मी आध्‍यात्मिक तरंगांचा प्रवाह अनुभवला.

इ. येथे भगवंत आपल्‍या अगदी जवळ असल्‍याचे अनुभवले.

ई. रामनाथी आश्रमात हिंदु राष्‍ट्राचे प्रतिरूप पाहिले.

उ. सनातन नित्‍य निरंतर असल्‍याची जाणीव झाली.’

२९. श्री. अजय कुमार साहू (अखिल विश्‍व गायत्री परिवार), बिलासपूर

अ. ‘रामनाथी आश्रम पाहून वाटले, ‘प्रत्‍येक मंदिर या आश्रमासारखे व्‍हावे.’

आ. दर्शनार्थी आणि साधक यांना धर्मज्ञान देण्‍यासाठी हा आश्रम एक आदर्श आहे.

इ. साधकांचा आपलेपणा, समर्पण आणि मार्गदर्शन (Guidance) उल्लेखनीय आहे.’

३०. अधिवक्‍ता आशुतोष कुमार शुक्‍ला (उच्‍च न्‍यायालय), वसुंधरा, गाझियाबाद, उत्तरप्रदेश.

अ. ‘आश्रम पाहून अत्‍यंत सुखद आणि ऊर्जेने परिपूर्ण अशी अनुभूती आली.

आ. काही ठिकाणी दिव्‍यता आणि सकारात्‍मकता यांची वैयक्‍तिक अनुभूती आली.

इ. आश्रम पहाण्‍याचा अनुभव खरोखर अद़्‍भुत आहे.’

३१. श्री. एस्.पी. सुरेश (हिंदु राष्‍ट्र सेना), देवनागिरी, कर्नाटक.

अ. ‘आश्रम पाहून चांगले वाटले.

आ. एवढा भव्‍य आश्रम मी दुसरीकडे कुठेच पाहिला नाही.’

३२. श्री. रामनारायण मिश्र (आंतरराष्‍ट्रीय अध्‍यक्ष, अखिल विश्‍व सरयूपारीण ब्राह्मण महासभा), नागपूर

अ. ‘आश्रम पाहून अद़्‍भुत वाटले.

आ. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे नियोजन पाहून मी भावविभोर झालो.’

३३. श्री. कृष्‍ण गुर्जर (प्रांत सुरक्षा प्रमुख, बजरंग दल), हिसार, हरियाणा.

अ. ‘आश्रम पहातांना एक क्षणभरही ‘मी पृथ्‍वीवर आहे’, असे मला वाटले नाही. मी दुसर्‍याच कोणत्‍या तरी लोकात असल्‍याची अनुभूती मला येत होती.’

‘संगीत’ आणि ‘संशोधन’ या विषयांवरील PPT (Power Point Presentation (टीप) पाहून मान्‍यवरांनी दिलेले अभिप्राय

टीप – हे एक सॉफ्‍टवेअर (संगणकीय प्रणाली) असून यावर संबंधित विषयांची विविध वैशिष्‍ट्ये दाखवता येतात.

३४. अधिवक्‍ता आशुतोष कुमार शुक्‍ला, उत्तरप्रदेश

अ. ‘संगीतातील संशोधनाची ही दिशा आणि उद्देश मला अगदीच नवीन अन् अद़्‍भुत वाटला.

आ. ‘सनातन धर्म खरोखरच वैज्ञानिक आहे’, हे मला आज समजले.’

३५. श्री. अजय कुमार साहू, बिलासपूर

अ. ‘पी.पी.टी. पाहून ‘आमची सनातन ज्ञान-परंपरा किती अधिक वैज्ञानिक आणि कल्‍याणकारी आहे’, हे माझ्‍या लक्षात आले.’

३६. श्री. रामनारायण मिश्र, नागपूर

अ. ‘अतिशय सुंदर ! कलेच्‍या माध्‍यमातून ईश्‍वराच्‍या पवित्रतेचे वैज्ञानिक विश्‍लेषण अतिशय सुंदर वाटले.’

(सर्व सूत्रांचा दिनांक २०.६.२०२३)

३७. श्री. मुन्ना कुमार शर्मा (राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारत हिंदु महासभा) नवी देहली.

अ. ‘आश्रमात सतत पालट झाल्याचे दिसून येतात.

आ. गुरुदेव डॉ. आठवले आणि देवता यांच्या कृपेने आश्रमात आध्यात्मिक वातावरणाचा विस्तार सतत होत आहे.’

३८. श्री. अजित सिंह बग्गा (राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष, व्यापार मंडळ आणि अध्यक्ष वाराणसी व्यापार मंडळ), सिगरा, वाराणसी

अ. ‘आश्रम पाहून शांती, प्रेरणा, आत्मविश्वास आणि चांगले विचार मिळाले.

आ. पुनःपुन्हा येथे येण्याची इच्छा उत्पन्न झाली आहे.

इ. आश्रमात जे कुणी भक्तगण आहेत, त्यांचे समर्पण प्रशंसनीय आहे.

ई. चांगली वर्तणूक (व्यवहार), सेवा आणि तळमळ यांसह प्रत्येक गोष्ट स्पष्ट करून सांगणे ही गोष्ट अत्यंत प्रशंसनीय आहे.’

३९. अधिवक्ता (डॉ.) एच्.सी. उपाध्याय, भाग्यनगर, आंध्रप्रदेश.

अ. ‘रामनाथी आश्रमात फारच चांगले वाटले.

आ. आपले कार्य प्रशंसनीय आहे.

इ. अध्यात्मावरील संशोधन युवावर्गाला प्रेरित करील.’

४०. श्री. निधीश गोयल (संचालक, जम्बू टॉक्स), जयपूर, राजस्थान.

अ. ‘या वेळी मला गोव्यातील समुद्रकिनार्‍यावर जाण्याची इच्छा झाली नाही. ‘मंदिरे आणि आश्रम स्थानावरच रहावे’, असे वाटले.’

४१. श्री. वीरेश त्यागी (राष्ट्रीय कार्यालय मंत्री, अखिल भारत हिंदु महासभा) बिजनौर, उत्तरप्रदेश.

अ. ‘आश्रमात येताक्षणीच गुरुजींचा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा) आशीर्वाद लाभतो. आणखी जेवढ्या वेळा मी आश्रमात येईन, तेवढ्या वेळा मला त्यांचे अधिक आशीर्वाद लाभतील.’

 

सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून मान्यवरांनी दिलेला अभिप्राय

१. ‘माणसाचे कपडे आणि त्यांची छायाचित्रे, तसेच देवतांची चित्रे यांवर पडलेल्या डागांमुळे ‘सूक्ष्मातील दृष्टीचे परिणाम’ याविषयी जाणीव झाली.’ – श्री. नवीन कुमार, शिवमोग्गा, कर्नाटक.

२. ‘डोळ्यांना न दिसणारी अगोचर (स्थिर, अचल) शक्ती आहे. सत्य पहायचे असल्यास साधना करावी लागते.’ – श्री. शिवप्रसाद, चंदापुरा, बेंगळुरू, कर्नाटक.

३. ‘हे प्रदर्शन पाहिल्यानंतर अध्यात्मात आणि ईश्वराचे स्मरण करत समर्पित झाल्यावर आपले प्रत्येक ध्येय साध्य होऊ शकते.’ – श्री. अजित सिंह बग्गा, सिगरा, वाराणसी.

४. ‘या क्षेत्राविषयी मला काहीच ज्ञान नव्हते. आता माझी उत्सुकता वाढली आहे.’ – अधिवक्ता (डॉ.) एच्.सी. उपाध्याय, हैदराबाद, आंध्रप्रदेश.

५. ‘हे प्रदर्शन पाहून माझ्यामध्ये सूक्ष्मातून एक सकारात्मक प्रवाह जातांना मला जाणवला.’ – श्री. शशिकांत दुबे (जिल्हा सचिव, ब्राह्मण सभा) जिल्हा दुर्ग, छत्तीसगड.

(सर्व सूत्रांचा दिनांक १८.६.२०२३)

 

‘संशोधन’ आणि ‘संगीत’ या विषयांवरील PPT (Power Point Presentation (टीप) पाहून मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

टीप – हे एक सॉफ्टवेअर (संगणकीय प्रणाली) असून यावर संबंधित विषयांची विविध वैशिष्ट्ये दाखवता येतात.

१. ‘आपण संगीताचा अत्यंत सूक्ष्म स्तरावर अभ्यास आणि संशोधन केले आहे. ‘संगीताचे मानवी मनावर होणारे परिणाम इतरांना समजावून सांगणे’, हे फार चांगले कार्य आहे.’ – श्री. श्रवण कुमार, शिवपूर, वाराणसी

२. संगीत आणि संशोधन याविषयी मला काहीच माहिती नव्हती. मला पहिल्यांदाच हे समजले की, संगीताचा आमच्या जीवनावर एवढा प्रभाव पडू शकतो.’ – श्री. अविनाश कुमार बादल, प्रदेश अध्यक्ष, हिंदु पुत्र संघटन, बिहार

३. फारच उत्तम ! वैज्ञानिक संशोधनावर आधारित संगीत विद्येचा वातावरणावर आणि वातावरणाचा संगीतावर होणारा प्रभाव अतिशय चांगल्या प्रकारे समजावून सांगितला.’ – मेजर सरस त्रिपाठी, लेखक अन् प्रकाशक, प्रज्ञा मठ पब्लिकेशन , गाजियाबाग, उत्तरप्रदेश

(सर्व सूत्रांचा दिनांक : १६.६.२०२३)

४. ‘हे सादरीकरण पुष्‍कळ चांगले होते. ‘साधनेने सात्त्विकतेत वाढ कशी होते आणि तिचा परिणाम निर्जीव वस्‍तूंवरही कसा होतो ?’, हे दाखवण्‍याची एक अनोखी पद्धत शिकायला मिळाली.’ – श्री. श्रीकांत मोदी

५. ‘भारतीय शास्‍त्रीय संगीत आणि भक्‍तीभाव यांचा सूक्ष्म स्‍तरावर होणार्‍या परिणामांतील भेद स्‍पष्‍ट करणारे हे सादरीकरण होते.’ – डॉ. निशांत दास, धनबाद, झारखंड.

(सर्व सूत्रांचा दिनांक : १७.६.२०२३)

६. ‘देवत्व असते, त्या ठिकाणी भगवंताची अगोचर (स्थिर, अचल) शक्ती असते. त्यामुळे कलाकारालाही ती शक्ती व्यापून टाकते.’ – श्री. शिवप्रसाद, चंदापुरा, बेंगळुरू, कर्नाटक .

७. ‘या संगणकीय प्रणालीमुळे सकारात्मक आणि नकारात्मक शक्ती समजते. सुंदर अनुभव आहे.’ – श्री. शिवय्या शास्त्री (कार्याध्यक्ष, जयकर्नाटक जनपरा वेदिके ) शिवमोग्गा, कर्नाटक

८. ‘ॐ चिन्ह आवडले.’ – श्री. शिवकुमार, कर्नाटक

 

मान्यवरांना आलेल्या अनुभूती

१. ‘आश्रमाला भेट दिल्यावर माझा देह हलका झाला. पुष्कळ आनंद वाटला आणि मन अध्यात्माकडे झुकल्याचे जाणवले.’ – अधिवक्ता मल्लेशाप्पा न. बाडगी, लक्ष्मेश्वर

२. ‘आश्रम पाहून ‘हे नालंदा विश्वविद्यालय आहे’, अशी अनुभूती आली.’ – श्री. शिवप्रसाद, चंदापुरा, बेंगळुरू, कर्नाटक

(सर्व सूत्रांसाठी दिनांक १६.६.२०२३)

Leave a Comment