वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवात ‘हिंदु राष्ट्र आक्षेप आणि खंडन’ या ‘ई बुक’चे प्रकाशन !

Article also available in :

‘हिंदु राष्ट्र आक्षेप आणि खंडन’ या ‘ई बुक’चे प्रकाशन करतांना श्री जामडी पाटेश्‍वरधाम सेवा संस्थानचे संचालक पू. रामबालक दासजी महात्यागी महाराज आणि इतर मान्यवरवैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवात २१ जून या दिवशी ‘हिंदु राष्ट्र – आक्षेप आणि खंडन’ या मराठी आणि हिंदी भाषेतील ‘ई बुक’चे छत्तीसगडमधील श्री जामडी पाटेश्‍वरधाम सेवा संस्थानचे संचालक पू. रामबालक दासजी महात्यागी महाराज यांच्या शुभहस्ते प्रकाशन झाले. या वेळी व्यासपिठावर सनातनचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, देहली येथील अर्थशास्त्रज्ञ श्री. ऋषी वशिष्ठ आणि तेलंगाणा येथील भारतीय स्वाभिमान समितीच्या सल्लागार श्रीमती एस्थर धनराज या उपस्थित होत्या.

हे ‘ई बुक’ विक्रीसाठी अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध असणार आहे. भारतात सेक्युलरवादी ‘हिंदु राष्ट्रा’वर आक्षेप घेतात. सेक्युलरवादी हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेला घटनाविरोधी म्हणतात. अशा प्रकारच्या अनेक आक्षेपांचे खंडन या पुस्तकात आहे.

 

Leave a Comment