१६ ते २२ जून २०२३ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे अकरावे अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन (वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव) चालू आहे. या अधिवेशनात सहभागी झालेले संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली अन् येथील कार्याची ओळख करून घेतली.
‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’निमित्त गोवा येथे आलेल्या मान्यवरांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर दिलेले अभिप्राय
१. आश्रम अध्यात्म आणि सात्त्विकता यांनी भरलेले आहे
‘रामनाथी आश्रमातील संपूर्ण वातावरण अध्यात्म आणि सात्त्विकता यांनी भरलेले आहे. आश्रमात तेज जाणवते. थोडक्यात ही व्यक्तीमत्त्व विकास करणारी प्रयोगशाळा आहे.’ – आचार्य डॉ. अशोक कुमार मिश्र (सभापती (एशिया चॅप्टर)), विश्व ज्योतिष महासंघ, पाटणा, बिहार आणि श्रीमती हरिप्रिया देवी (डॉ. कुमार यांच्या पत्नी) (सभापती, साउथ एशियन एस्ट्रो फेडरेशन (भारत संभाग)), पाटणा, बिहार.
२. मनाला प्रसन्न करणारी आश्रमव्यवस्था !
‘आश्रमातील व्यवस्था आणि स्वच्छता पुष्कळ छान अन् मनाला प्रसन्न करणारी आहे. येथे पुष्कळ सात्त्विकताही आहे. – डॉ. राजेंद्र दीक्षित, सचिव, परशुराम सर्वभाषीय ब्राह्मण संघ, नागपूर, महाराष्ट्र.
३. मी भगवंताच्या दारी आलो आहे !
‘रामनाथी आश्रम पहातांना मला ‘मी भगवंताच्या दारी आलो आहे’, असे वाटले. माझे मन शुद्ध आणि प्रसन्न झाले.’ – श्री. राजेंद्र मधुकर भावसार, धुळे, महाराष्ट्र. (१५.६.२०२३)
४. श्री. विकाश धाकड, महाकाल युवा समिती, बाराखेडा, गंगासा, मंदसौर, मध्यप्रदेश.
‘रामनाथी आश्रमातील प्रत्येक ठिकाणचे वातावरण शुद्ध आहे. प्रत्येक ठिकाणची शुद्धता आणि व्यवस्था पाहून मला पुष्कळ चांगले वाटले.’ (१५.६.२०२३)
५. सौ. सुषमा विजयसिंह गहेरवार, संस्थापिका, श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट, नांदेड, महाराष्ट्र.
अ. रामनाथी आश्रम सकारात्मक ऊर्जा देणारा आहे ! : ‘आमच्या सुदैवानेच आम्हाला रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाकडे खेचून आणले. आश्रम पुष्कळ चांगला आणि सकारात्मक ऊर्जा देणारा आहे. जे आम्हाला आश्रमापर्यंत घेऊन आले, त्यांना मी धन्यवाद देऊ इच्छिते आणि सद़्गुरु चरणी प्रार्थना करते, ‘आम्हाला योग्य दिशा देऊन आमच्याकडूनही चांगले कार्य करून घ्यावे !
आ. संगीत आणि संशोधन : संगीताच्या माध्यमातून आम्हाला जी सकारात्मकता मिळते, ती अत्यंत प्रभावी माध्यमांद्वारे पी.पी.टी. (Power Point Presentation)द्वारे सादर करण्यात आली आहे.
सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून मान्यवरांनी दिलेले अभिप्राय
१. ‘हे प्रदर्शन पाहिल्यावर अतिशय दैवी अनुभव मिळाला आणि ‘सकारात्मकतेच्या समवेतच विघ्न निर्माण करण्यासाठी नकारात्मकता सक्रीय असते’, याचे ज्ञान झाले.’ – आचार्य डॉ. अशोक कुमार मिश्र, पाटणा, बिहार.
२. ‘मानवाच्या जीवनात सूक्ष्म जगताचा निश्चित प्रभाव पडतो; म्हणून साधना करून सकारात्मक शक्ती आणि ऊर्जा प्राप्त करता येते.’ – अधिवक्ता प्रवीणचंद्र जंगले, जळगाव (१६.६.२०२३)
‘संगीत’ आणि ‘संशोधन’ या विषयांवरील PPT (Power Point Presentation) पाहून मान्यवरांनी दिलेला अभिप्राय
१. ‘हिंदु सनातन धर्मातील परंपरेनुसार विषयांवर आधुनिक वैज्ञानिक दृष्टीकोनातून संशोधन करणे काळानुसार आवश्यक आहे’, असे वाटले.’ – आचार्य डॉ. अशोक कुमार मिश्र, पाटणा, बिहार.
२. ‘या विषयावर जे संशोधन होत आहे, ते नक्कीच प्रशंसनीय आहे’, असे वाटले.’ – डॉ. राजेंद्र दीक्षित, नागपूर.
३. ‘संगीत कलाकाराने साधनाही करावी. कला ही केवळ पैसा कमावण्याकरता नसून संगीत कलाकाराने साधनाही करायला हवी’, असे वाटले.’ – श्री. गोरक्षनाथ भराडे, श्री शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान, नगर, महाराष्ट्र.
(सर्व सूत्रांचा दिनांक १५.६.२०२३)
अभिप्राय
श्री. स्वागत रघुवीर नाटेकर (गोरक्षक), इन्सुली, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग, महाराष्ट्र.
‘आश्रम पाहून, तसेच साधक करत असलेल्या साधनेमुळे माझे मन प्रसन्न झाले.’ (१६.६.२०२३)
अधिवक्ता आशिष व्ही. वानखडे (अध्यक्ष, वकील संघ), दारव्हा, जिल्हा यवतमाळ, महाराष्ट्र.
‘आश्रम बघता बघता माझे मन ध्यानावस्थेत जात असल्याची अनुभूती मला आली.’ (१६.६.२०२३)
श्री. चिरण वीर प्रताप खड्का, प्रमुख, ॐ रक्षा वाहिनी, नेपाळ.
‘हा आश्रम आपल्या वैदिक सनातनी हिंदूंसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.’ (१५.६.२०२३)
सौ. जयश्री स. जैस्वाल, श्री संतोषीमाता मंदिर, किनवट, नांदेड, महाराष्ट्र. आश्रम पाहून पुष्कळ समाधान वाटले !
‘येणार्या पिढीला साधना आणि संस्कार यांची नितांत आवश्यकता आहे. हे कार्य पुष्कळ विशाल आहे. कार्याचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत.’ (१५.६.२०२३)
श्री. हरीश जोशी, प्रदेश महामंत्री, श्रीराम युवासेना, मध्यप्रदेश.
आश्रम पाहिल्यावर स्वर्गाचेच स्मरण झाले !
‘आश्रमात आल्यावर जे काही मी पाहिले, ते पाहून मला स्वर्गाचेच स्मरण झाले.
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी चालू असलेले हे कार्य पुष्कळ मोठे आहे. ‘या आश्रमात निःस्वार्थी भावाने चालू असलेले सेवाकार्य आणखी वृद्धिंगत होवो’, अशी सदिच्छा मी व्यक्त करतो.’ (१५.६.२०२३)
श्री. उमाकांत विश्वनाथ रानडे (सचिव, चित्पावन ब्राह्मण संघ), नागपूर, महाराष्ट्र.
अ. ‘आश्रमाची वास्तू अतिशय भव्य आणि दिव्य आहे.
आ. आश्रमात मला सगळीकडे सकारात्मक ऊर्जा जाणवली.
इ. आश्रमातील स्वच्छता, तसेच साधकांची नम्रता आणि समजावण्याची शैली निश्चितच अभिनंदनीय आहे.’ (१५.६.२०२३)