वार, सण, उत्सव आणि व्रते यांच्याशी संबंधित रंगांचे कपडे परिधान केल्याने त्या त्या देवतेच्या तत्त्वाचा लाभ होतो. ही प्रक्रिया कशी चालते, ते या लेखातून समजून घेऊया.
१. वार, सण, उत्सव आणि व्रते यांच्याशी संबंधित
देवतेच्या तत्त्वाशी निगडित असलेल्या रंगाचे कपडे
परिधान केल्याने त्या देवतेच्या तत्त्वाचा अधिक लाभ होणे
आठवड्यातील सात वार हे एकेका देवतेच्या उपासनेचे वार आहेत. प्रत्येक दिवशी वातावरणात त्या दिवसाशी संबंधित देवतेचे तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असते. सण, उत्सव आणि व्रते यांच्यासंदर्भातही असेच आहे. त्या दिवशी त्यांच्याशी संबंधित देवतेचे तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असते. त्या देवतेच्या तत्त्वाशी निगडित असणार्या रंगाचे कपडे परिधान केल्याने संबंधित देवतेचे तत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट होण्यास साहाय्य होते. साहजिकच असे कपडे परिधान करणार्याला देवतेच्या तत्त्वाचा अधिक प्रमाणात लाभ होऊ शकतो.
१ अ. वारांशी संबंधित देवता आणि तिला पूरक असलेला कपड्यांचा रंग
वार |
देवता |
कपड्यांचा रंग |
रंग कशाचे दर्शक ? |
१. ‘सोमवार | शंकर | पांढरा | वैराग्य |
२. मंगळवार | अ. श्री लक्ष्मी
आ. श्री गणपति |
पिवळा
शेंदरी |
चैतन्य
ज्ञान |
३. बुधवार | पांडुरंग | निळा | भक्ती |
४. गुरुवार | दत्त | फिकट तपकिरी | विरक्ती |
५. शुक्रवार | पार्वती / श्री लक्ष्मी | पिवळसर तांबूस | बलवर्धक तेज |
६. शनिवार | मारुति | तांबूस | गतीमानता |
७. रविवार |
रवि(सूर्य) |
लाल | शक्ती’ |
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २४.१२.२००६, सकाळी १०.२१)
२. वारांनुसार निर्गुणातून सगुणाकडे जातांना रंगात होत जाणारा पालट
संकलक : मंगळवार अन् शुक्रवार या देवीच्या दोन वारांना पूरक असलेला रंग आणि दर्शक यांत भेद (फरक) कसा ?
एक विद्वान : सोमवार हे लयदर्शक विलीनतेचे, म्हणजेच शिवदर्शक निर्गुणतेचे, सर्वसमावेशकतेचे प्रतीक असल्याने त्याला पूरक असलेल्या पांढर्या रंगातून निर्माण होणारा आणि सगुणाकडे धावणारा प्रवाह हा टप्प्याटप्प्याने रविवारपर्यंत कनिष्ठ स्तरावर तांबड्या रंगाच्या साहाय्याने शक्तीरूपी सगुणात येतो. सोमवारच्या लगत येणारा मंगळवार हा निर्गुण-सगुण तत्त्वाचे प्रतीक असल्याने तो कार्यकारी चैतन्यदर्शक आहे; म्हणून त्याचा रंग पिवळा आहे. या दिवशी देवी तारक भावात, तर त्या पुढील सगुण टप्प्याला ती शक्तीकडे धावणार्या तत्त्वाच्या साहाय्याने मारक तत्त्वात कार्य करते; म्हणून शुक्रवारी तिचे ब्रह्मांडात येणारे तत्त्व हे बलवर्धक तेजाशी संबंधित असते; म्हणून शुक्रवारी पिवळसर तांबूस रंग आहे. जसा सगुणात साकार होण्याचा टप्पा जवळ येतो, तशी तत्त्वातील कार्यरूपी गतीमानता वाढते. – (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २४.१२.२००६, दुपारी १२.३२)
३. सणाशी संबंधित देवतेच्या तत्त्वाशी निगडित असलेल्या
रंगाचे कपडे परिधान केल्याने साधिकेला आलेली अनुभूती
३ अ. श्री गणेश चतुर्थीला शेंदरी रंगाचे (श्री गणेशाच्या रंगाचे)
कपडे घातल्यावर आध्यात्मिक उपाय होणे
‘श्री गणेश चतुर्थीच्या आदल्या रात्री माझ्या मनात विचार आला, ‘आता गणेशलहरी पृथ्वीवर आकृष्ट होण्याचे प्रमाण वाढले असेल; पण या लहरी आकृष्ट झाल्या, हे मला कसे कळेल ? त्या लहरी कशा असतात ?’ श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी मी प्रार्थना करत होते. त्या वेळी अचानक ‘माझ्यावर आध्यात्मिक उपाय होत आहेत’, असे मला जाणवू लागले. तेव्हा मी ‘मला असे का जाणवत आहे’, याचा शोध घेतल्यानंतर ‘मी परिधान केलेल्या शेंदरी रंगाच्या कपड्यांमधून माझ्यावर आध्यात्मिक उपाय होत आहेत’, असे माझ्या लक्षात आले आणि तेव्हाच माझ्या कपड्यांचा रंग, म्हणजे शेंदरी रंग हा गणेशतत्त्वाशी निगडित असल्याचेही लक्षात आले. त्या वेळी मला ढेकरा येऊन त्या माध्यमातून माझ्या शरिरातील काळी (त्रासदायक) शक्ती बाहेर पडू लागली. ‘श्री गणेश चतुर्थीचा दिवस, मी परिधान केलेल्या कपड्यांचा रंग आणि माझ्यावर होत असलेले आध्यात्मिक उपाय’ यांच्या परस्परांशी असलेल्या संबंधासंदर्भात मला जाणवलेल्या सूत्रांविषयी मार्गदर्शन व्हावे, म्हणून मी प.पू. डॉक्टरांकडे गेले. प.पू. डॉक्टरांच्या खोलीत प्रवेश करताच त्यांनी मला विचारले, ‘‘आज काय गणपतीच्या रंगाचे कपडे घातले का ?’’ त्या क्षणी मला जाणवलेला सर्व भाग योग्य आहे, हे स्पष्ट झाले. त्यानंतर मी त्यांना माझी उपरोक्त अनुभूती सांगितली. त्यावर प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘पुढेही सण आणि वार यांच्या दिवशी त्या त्या संबंधित देवतेच्या रंगाचे कपडे परिधान केल्यास काय परिणाम होतो, याचा अभ्यास करायला आपल्याला एक उदाहरण मिळाले.’’ – सौ. योगेश्री घोळे, सिंगापूर. (पूर्वाश्रमीच्या कु. योगेश्री श्रीकांत पाध्ये, २००६)
३ आ. उपास्यदेवतेनुसार उपासकांनी वापरावयाच्या कपड्यांचे रंग
उपास्यदेवता |
कपड्यांचा रंग |
१. ‘भक्तीमार्गियांची उपास्यदेवता
अ. ऋषी आ. सर्वसाधारण क्षुद्रदेवता इ. अप्सरा, यक्ष अन् किन्नर या क्षुद्रदेवता ई. उच्चदेवता |
केशरी लाल नारिंगी पांढरा किंवा पिवळा |
२. तंत्रमार्गियांची (तांत्रिकांची) उपास्यदेवता
अ. सर्वसाधारण तांत्रिक आ. मायावी मांत्रिक इ. मोहिनी मांत्रिक |
काळा चमकदार पिवळा गुलाबीसर’ |
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ज्येष्ठ कृष्ण षष्ठी, कलियुग वर्ष ५११० (२६.५.२००८, रात्री ९.४७)
टीप – तांत्रिक उपासकांविषयी (अघोरी मार्गाने उपासना करणार्यांविषयी) माहिती केवळ विषयाची पूर्तता होण्याच्या दृष्टीने दिली आहे. सर्वसाधारण पूजकाच्या संदर्भात हे सूत्र लागू नाही.
४. हिंदु धर्मात काळा रंग त्याज्य मानलेला असणे
‘स्नानं दानं तपो होमः पितृय्ज्ञश्च तर्पणम् ।
पंच तस्य वृथा यज्ञा कृष्णवर्णस्य धारणात् ।। (स्मृतीवचन)
अर्थ : संध्या, स्नान, दान, तप, होम, पितृयज्ञ, तर्पण ही आणि यांसारखी धार्मिक कृत्ये काळी वस्त्रे नेसून केली, तर ती व्यर्थ होतात.
हिंदु स्त्री-पुरुषांना कृष्णवर्णाचे (काळे) वस्त्र निषिद्ध आहे. काळ्या काठाचे वस्त्र परिधान करणे सदाचार नसून अनाचार आहे. कृष्णवर्ण तंतू असलेले वस्त्र धारण करणे, हे पातक आहे. काळ्या रंगाच्या पगड्या, टोप्या, रुमाल, शर्ट, साड्या अन् लुगडी परिधान करणार्या शास्त्रनिष्ठ आणि श्रद्धावान हिंदूंना ते दुःखोत्पादक आहे. सोवळ्यात धुतलेले वस्त्र चालते; परंतु काळ्या रंगाचे वस्त्र धुतलेले असले, तरी आणि कुणा पवित्र गोष्टीचा त्याला स्पर्श झालेला असला, तरी ते काळ्या रंगाचे असल्याने निषिद्ध आहे. काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून स्वयंपाक करणे किंवा अन्न वाढणे निषिद्ध कर्म आहे.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी